Home | Gossip | Anju Mahendru Live In Relation With Rajesh Khanna For 6 Year

6 वर्षे लिव्ह-इन मध्ये राहिल्यानंतर बॉयफ्रेंडच्या रोकटोक आणि भांडणांमुळे तुटले होते अभिनेत्रीचे नाते, बदला घेण्यासाठी तिच्याच घरासमोर काढली होती BF ने आपली वरात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:13 AM IST

दिवसात 40 कप चहा, 40 सिगारेट ओढते ही अभिनेत्री, यालाच मानते आपले फिटनेस सीक्रेट...

 • Anju Mahendru Live In Relation With Rajesh Khanna For 6 Year

  एंटरटेनमेंट डेस्क : ज्येष्ठ अभिनेत्री अंजू महेंद्रु या आता 73 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 11 जानेवारी, 1946 ला झाला होता. त्यांनी 13 वयाच्या व्या वर्षीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. अनेक फिल्म आणि टीव्ही सीरियल्समध्ये काम करणाऱ्या अंजू यांचे आयुष्य खूप ट्रेजडीने भरलेले राहिले. नाखरे प्रेम मिळले ना संसार थाटू शकल्या.

  राजेश खन्नासोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्या...
  - सुपरस्टार राजेश खन्ना त्यांचे पहिले प्रेम होते. ते दोघे सुमारे 6 वर्ष लिव्ह-इन रिलेशनमध्ये होते. 60-70 दशकांमध्ये अंजू आणि राजेश यांची लव्ह स्टोरी खूप चर्चेत होती. पण हे नाते दुर्दैवाने तुटले. राजेश यांच्या स्वभावामुळे हे ब्रेकअप झाले होते. सांगितले जाते की त्यांना अंजू यांचे काम करणे पसंत नव्हते पण त्यांना त्यांचे करियर बनवायचे होते. यामुळेच दोघांमध्ये वाद व्हायचे. ब्रेकअपनंतर राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री डिंपल कपाड़िया यांच्यासोबत लग्न केले.

  - एका इंटरव्यूमध्ये अंजू यांनी सांगितले होते, 'राजेश यांना माझ्या स्कर्टपासून ते साडी नेसण्यापर्यंतही प्रॉब्लेम होता. जेव्हा मी स्कर्ट घालायचे तेव्हा ते म्हणायचे की तू साडी का नेसत नाहीस, आणि जेव्हा मी साडी नेसायचे तेव्हा ते म्हणायचे की तू साडी का नसलीस ?

  - स्टारडस्टला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये अंजू यांनी सांगितले होते, त्यांची एक फिल्म फ्लॉपझाली तर ते खूप वैतागले. ते खूप जास्त मूडी होते. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग यायचा.

  अंजू यांच्या घरासमोरूनच निघाली होती वरात...
  अंजू यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यांनतर राजेश खन्ना यांनी डिंपल कपाड़िया यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी एक किस्सा खूप प्रसिद्ध होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश खन्ना यांनी जाणून बुजून आपली वरात अंजू यांच्या घरासमोरून काढली होती.

  क्रिकेटरसोबतही होते नाते...
  राजेश खन्ना यांच्याशी नाते तुटल्यावर अंजू यांचे वेस्टइंडीज क्रिकेटर गैरी सोबर्स यांच्यासोबतही अफेयर झाले. दोघांचे हे नाते साखरपुड्यापर्यंत पोहोचता पोहोचता तुटले. सोबर्स यांनी आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये या प्रेमाबद्दल लिहिले आहे, 'अंजू यांचे आई वडील आमच्या नात्यासाठी तयार नव्हते. त्यांना माझ्या अश्वेत असण्याचा प्रॉब्लेम होता. त्यामुळेच आमचे नाते टिकू शकले नाही.

  40 कप चहा 40 सिगारेट...
  इंडस्ट्रीमध्ये अंजू या स्मोकिंगसाठी ओळखल्या जातात. एका इंटरव्यूमध्ये अंजू यांनी आपल्या फिटनेसचे सिक्रेट स्मोकिंगच सांगितले. त्यांनी सांगितले होते, 'त्या एका दिवसात 40 कप चहा पितात आणि 40 वेळा स्मोकसुद्धा करतात'.

Trending