आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंक ज्योतिष : यावरून समजू शकते लग्नानंतर कसे राहील तुमचे वैवाहिक आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एकदा तरी प्रेमात पडतोच असे म्हटले जाते. परंतु काही लोक घाईगडबडीत प्रेम आणि लग्न तर करतात परंतु नंतर समजते की त्यांनी चूक केली आहे. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि याचा वाईट प्रभाव येणाऱ्या आयुष्यावर पडतो. तुम्हीसुद्धा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल आणि लग्नासाठी प्रपोज करण्याच्या विचारात असाल तर थोडे थांबा. न्यूमरॉलॉजीमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या मुळांकाच्या व्यक्तीचे प्रेम संबंध कोणत्या मुळांकाच्या व्यक्तीसोबत योग्य राहतात.


मुळांक म्हणजे काय?
मुळांकाचा अर्थ तुमची जन्म तारीख. म्हणजेच तुमचा जन्म 2 मार्चला झाला असेल तर मुळांक 2 असेल. परंतु जन्म तारीख 10 ते 31 तारखेमाधील असेल तर तर या दोन अंगाची बेरीज करून जो अंक येईल तो तुमचा मुळांक असेल. उदा. तुमची जन्म तारीख 11 असेल तर तुमचा मुळांक (1+1=2) 2 असेल.


मुळांक 1
ज्या लोकांचा मुळांक 1 असेल त्यांच्यासाठी 2, 3, 7 आणि 9 मुळांक असलेल्या व्यक्तीची जोडी एकदम फिट राहते. या लोकांनी चुकूनही 5 आणि 6 मुळांक असलेल्या लोकांशी मैत्री करू नये.


मुळांक 2
मुळांक 2 असलेली व्यक्ती 1, 3, 4 आणि 6 मुळांक असलेल्या व्यक्तीला प्रपोज करू शकते. यांची लव्ह लाइफ रोमँटिक राहते परंतु 5 आणि 8 मुळांक असलेल्या लोकांपासून दूर राहावे.


मुळांक 3
मुळांक 3 असलेल्या लोकांची जोडी 1, 2, 5 आणि 7 मुळांक असलेल्या लोकांशी चांगली जमते. 4 आणि 8 मुळांक असलेल्या लोकांपासून दुरावा ठेवावा.


मुळांक 4
ज्या लोकांचा मुळांक 4 असेल, त्यांनी 1, 2, 7 आणि 9 मुळांक असलेल्या लोकांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेण्यास हरकत नाही. 3 आणि 5 मुळांक असलेल्या लोकांसमोर कधीही प्रेम प्रस्ताव ठेवू नये.


मुळांक 5
तुमचा मुळांक 5 असेल तर तुमचे 3, 9, 1, 6, 7 आणि 8 मुळांक असलेल्या लोकांसोबत प्रेम यशस्वी होऊ शकते. 2 आणि 4 मुळांक असलेल्या लोकांशी जास्त जवळीकता करू नये.


मुळांक 6
मुळांक 6 असलेले लोक 3, 2, 4, 5, 6 मुळांक असलेल्या लोकांसोबत कंफर्ट फिल करतात. यामुळे यांच्यासोबत लव्ह लाइफ चांगली राहते. मुळांक 1 आणि 8 असलेल्या लोकांशी कधीही प्रेम करण्याची चूक करू नये.


मुळांक 7
ज्या लोकांचा मुळांक 7 आहे, त्यांच्यासोबत 2, 6, 3, 5 आणि 8 मुळांक असलेल्या लोकांची जोडी चांगली राहते. परंतु मुळांक 1 आणि 9 लोकांशी दुरावा ठेवावा.

बातम्या आणखी आहेत...