आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सबसे स्मार्ट कौन'च्या सेटवर अंकिता भार्गव झाली इमोशनल, थांबवावी लागली शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क: टीव्हीचे प्रसिध्द कपल करण पटेल आणि अंकिता भार्गवने नुकतीच सबसे स्मार्ट कौनच्या सेटला भेट दिली. ते येथे सेलिब्रिटी म्हणून पोहोचले होते. त्यांना हितेन तेजवानी आणि गौरी प्रधानने कंपनी दिली. परंतू शो अचानक मध्येच थांबवावा लागला. कारण अंकिता ही होस्ट रवी दुबेसोबत बोलताना इमोशनल झाली. 


रवी दुबेने करण आणि अंकिताच्या आयुष्यातील सर्वात चांगल्या आणि वाईट मूव्हमेंटविषयी विचारले. करण पटेलने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांविषयी सांगितले, तेव्हा त्याच्याकडे काही काम नव्हते. तो 4 वर्षे घरी बसून होता. त्याला वाटायचे की तो स्टार आहे, परंतू नंतर त्याला त्याच्या चुकीची जाणिव झाली. मग त्याने शिकणे सुरु केले. तो म्हणाला की, मी माझ्या कामाचा सन्मान करतो आणि माझ्या करिअरच्या सर्वात चांगल्या फेजवर आहे. 


परंतू दूसरीकडे या प्रश्नामुळे अंकिता गप्प झाली. सूत्रांनुसार रवीने अंकिताला जेव्हा आनंद आणि दुःखाविषयी विचारले तेव्हा ती आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवू शकली नाही. नुकतेच तिचे मिसकॅरेज झाले आणि यामुळे तिला तिच्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षणाची आठवण झाली. ती मध्येच शो सोडून स्टेजच्या मागे गेली. ती अश्रू अडवू शकली नाही. पुर्ण प्रोडक्शन टीमने तिला दिलासा दिला. शो एका तासानंतर सुरु झाला. यानंतर रवी दुबेने दुसरे प्रश्न विचारले. 
 

बातम्या आणखी आहेत...