आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: भारताच्या अंकिता रैनाने दिली विजयी सलामी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - यजमान भारताच्या अंकिता रैनाने अापल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने मंगळवारी ओअॅसिस पुरस्कृत २५ हजार अमेरिकन डॉलरच्या जागतिक मानांकन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. तसेच दुहेरीत ऋतुजा भोसलेने बाजी मारली. 

जिल्हा क्रीडा संकुलात अंकिता रैनाने महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात राेमानियाच्या बिगर मानांकित जकलिन आदींनाचा ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यादरम्यान तिची कामगिरी काैतुकास्पद ठरली. पहिल्या सेटमध्ये अंकिता ०-२ ने पिछाडीवर होती, पण नंतर तिने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत २-२ अशी बरोबरी केली. त्यानंतर दमदार पुनरागमन करताना तिला सूर गवसला आणि तिने उत्कृष्ट फोरहँड व बॅकहँडच्या जोरावर पहिला सेट ६-३ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र पहिल्यापासूनच आक्रमक खेळ व भेदक सर्व्हिसच्या साहाय्याने दुसरा सेट ६-१ ने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अाता हीच लय कायम ठेवण्याचा तिचा प्रयत्न असेल. तिला या स्पर्धेत किताबाची प्रबळ दावेदार खेळाडू मानले जाते. 

 

झील-प्रांजलाचा दुहेरीत पराभव : भारताच्या झिल देसाई व प्रांजलाचा दुहेरीत पराभव झाला. झिलला स्लोवाकियाच्या तमारा झिडान्सकने २-० असे हरविले. जपानच्या मियाबी इनोई विरुद्धच्या सामन्यात यादलपल्लीने दुखापतीमुळे २-६ अशा पिछाडीनंतर सामना सोडून दिला. भारताच्या ऋतुजा भोसले व चीनच्या काई लिन झांग या जोडीने मारिअमय व अलबिना खबिबुलीनाला ३-६, ७-६(५), ११-९ अशा फरकाने पराभूत केले. 

 

मंगळवारचे काही निकाल 
लेमोने (हाॅलंड) (५) वि. वि. वलेरिया (युक्रेन) ६-४, ६-३ 
 रेका लुका जानी (हंगेरी) वि. वि. नायदेनोवा (बल्गेरिया ) ६-३, २-६, ६-३ 
तमारा (स्लोव्हाकिया) १ वि. वि. झिल देसाई (भारत ) ६-३,६-१. 
पॉउला वि. वि. नास्तजा (स्लोव्हाकिया) ६-३ ६-३. 
 पीटर (पोलंड) वि. वि. जुनरी (जपान) ६-३,६-७(६) ६-४ 
चिइह यु ह्सू (तैपेई) वि. वि. मेलानिए क्लाफनेर (ऑस्ट्रिया) ६-० ६-३. 

बातम्या आणखी आहेत...