आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णांनी तारतम्य बाळगावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरविंद केजरीवालांनी प्रथम मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नाकारून नंतर बंगला घेण्याचे कबूल केल्यावरून तृणमूलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यामुळे अण्णा हजारे मनोमन सुखावले. इतके की अण्णांनी तत्परतेने ममताबाईंना साधेपणाचे प्रशस्तिपत्रक तर बहाल केलेच, पण लवकरच आपण राजकारणाविषयी मार्गदर्शनपर चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये भेटू असे कबूल केले. अण्णांबरोबर पहिल्यापासून काम केले त्या केजरीवालांशी मार्गदर्शनपर प्रोत्साहनाचे दोन शब्द बोलायला मात्र अण्णांना इतक्या महिन्यांत कधी वेळ झाला नाही; पण केजरीवालांनी राष्ट्रीय स्तरावर लोकसभा निवडणुकांमध्ये भाग घेण्याची तयारी सुरू केल्याबरोबर अण्णा अस्वस्थ झालेले दिसताहेत.