आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठा यू- टर्न: दोन संत, दोन पक्षांसोबत...दोघांचाही एकाच दिवशी ‘मुखभंग’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबांची कोलांटउडी
कुठे : नवी दिल्लीत शुक्रवारी एका शिबिरात आपली नवी भूमिका स्पष्ट केली.

वास्तविक, बाबा रामदेव यांच्या नाराजीचे मुख्य कारण आहे पाटलीपुत्रची उमेदवारी. या मतदारसंघातून त्यांना आपल्या समर्थकासाठी तिकीट हवे आहे; परंतु भाजपने रामकृपाल यांना तिकीट दिले.

परिणाम : बाबांची बदललेली भूमिका हा राजकीय दबावाचा एक भाग आहे. ते नवा पक्षही स्थापणार नाहीत किंवा भाजपलाही सोडणार नाहीत. मात्र, तिकिटांच्या वादात सापडलेल्या भाजपच्या अडचणी यामुळे काही दिवस नक्कीच वाढतील.

आम्ही कोणाचे गुलाम नाहीत
भाजपमध्ये सध्या सर्वकाही आलबेल आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला आमच्या मुद्द्यांवर तोंडी नव्हे, तर लिखित पाठिंबा दिला तरच आम्ही त्यांना साथ देऊ. आम्ही कोणाचे गुलाम नाहीत. त्यांच्याकडून उत्तर आले नाही तर नवीन पक्ष उभा करू.

फ्लॅशबॅक : 4 जानेवारीला बाबा रामदेव म्हणाले होते, काँग्रेस विनाशकारी आहे. मी मोदी यांना काही मुद्द्यांवर पाठिंबा देत आहे. 5 जानेवारीला त्यांनी मोदी आणि राजनाथसिंह यांची भेट घेतली. 1 मार्चपासून त्यांनी मोदींसाठी प्रचार सुरू केला.

अण्णांचे मतपरिवर्तन
कोठे पलटले : अण्णा हजारे शुक्रवारी अचानक दिल्लीला आले आणि पत्रकारांशी बोलले.
काय घडले होते : दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी दिल्लीत सभा घेतली, परंतु ती फ्लॉप ठरली. अण्णासुद्धा सभेत गेले नाहीत. तेव्हा ममतांनी सांगितले होते की, ही माझी नव्हे तर अण्णांची सभा होती.
वास्तविक अण्णा सध्या अलर्ट झाले आहेत. लोकांचा पाठिंबा न मिळाल्याने अण्णा सध्या सर्व पक्षांपासून दूर राहून प्रतिमा सुधारू इच्छित आहेत. यासाठीच त्यांनी 25 मार्चपासून उपोषणाची घोषणा केली.

आता मी कोणासोबतच नाही
मला दीदींचा साधेपणा आवडतो. मी ममता बॅनर्जींचे समर्थन करतो. परंतु त्यांच्या पक्षाचे नाही. त्या दिवशी सभेवर माझी नजर होती. दोन वाजेपर्यंत मी टीव्ही पाहत होतो. दोन-अडीच हजार लोक होते. मला फसवण्यात आले आहे.
आता मी कोणत्याच राजकीय पक्षाचे समर्थन करीत नाही.

फ्लॅशबॅक : 18 फेब्रुवारीला अण्णा हजारे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली तेव्हा ममता अण्णांच्या तीनदा पाया पडल्या होत्या. ममता खूप साधेपणाने राहतात आणि देशाला अशाच नेत्यांची गरज आहे. त्यामुळे मी देशभर त्यांचा प्रचार करीन, असे अण्णा म्हणाले होते.