आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare News In Marathi, Lok Sabha Elections,

ANALYSIS: अण्णा हजारे ममता बॅनर्जी आणि भाजपला जोडणारा पूल तर नाहीत?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्षाला जोडणारा पूल तर नाही, असा प्रश्न देशाच्या राजकीय वर्तूळात विचारला जात आहे. नरेंद्र मोदी प्रणित एनडीएला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज जवळपास सर्वच निवडणुकपूर्व चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांची मनधरणी करण्यासाठी अण्णा हजारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे सांगितले जात आहे.
अण्णा हजारे आणि ममता बॅनर्जी यांच्या दिल्लीतील रामलिला मैदानावरील रॅलीपूर्वी उठलेले काही प्रश्न
- टीम अण्णाचे अनेक सदस्य भाजपशी थेट संबंधित आहेत. अण्णांचे सहकारी माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह भाजपमध्ये सामिल झाले आहेत. किरण बेदी उघडपणे मोदींचे समर्थन करतात. असे असताना अण्णांची भूमिका कोणती असेल?
- अण्णांच्या निशान्यावर आम आदमी पार्टी आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने आप आणि कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी अण्णांना जवळ केले आहे. याचा अर्थ असा होतो, की तृणमूल कॉंग्रेस वाढले तर भाजपला त्याचा लाभ होणार आहे. हे अण्णांनाही हवे आहे का?
- उद्या असलेल्या रॅलीपूर्वी अण्णा हजारे पत्रकार परिषद घेऊ शकतात. यावेळी ते काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतात. या अपक्ष उमेदवारांचा लाभ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपला होऊ शकतो. याचा अण्णांनी विचार केला आहे का?
- किरण बेदी यांनी सांगितले आहे, की राजकारणात काहीही शक्य आहे. एनडीएला किती जागा मिळतात यावर भविष्यातील समिकरणे अवलंबून राहणार आहेत. किरण बेदी यांच्या या वक्तव्याचा अण्णांच्या भूमिकेशी संबंध आहे का?
-दिल्लीत पहिल्यांदाच तृणमूल कॉंग्रेस सात जागांवर निवडणूक लढवित आहे. दिल्लीत तृणमूलचा काही बेस नाही. पक्षाला वाटते, की अण्णांच्या प्रचारामुळे 'आप'चा प्रभाव कमी करता येईल. येथे 'आप'चा मुकाबला भाजपसोबत आहे. केंद्र सरकारवर जनता नाराज असल्याने दिल्लीतून कॉंग्रेसला कमीच मतदान होण्याची शक्यता आहे. असे असताना तृणमूलचे उमेदवार 'आप'ची मते खातील. अण्णांनी याचा विचार केला आहे का?