आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवाचे बरेवाईट झाल्यास जनता मोदींना जबाबदार धरेल..उपोषणाच्या चौथ्या दिवशी अण्णा हजारेंचे साडे तीन किलोने वजन घटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणचा आज चौथा दिवस आहे. अण्णांची प्रकृती खालावली असून त्याचे वजन साडे तीन किलोने घडले आहे. या दरम्यान, अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या जीवाला बरेवाईट झाल्यास जनता नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरेल, असे वक्तव्य अण्णांनी केले आहे.

 

अण्णा म्हणाले, 1 जानेवारीला अण्णांनी मोदींना पाठवलेले पत्र पंतप्रधानांना मिळाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना तसेच दुसर्‍या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. परंतु, पंतप्रधानांनी अण्णांच्या मागण्यांच्या पूर्ततेविषयी कुठलाच उल्लेख नाही.

 

दुसरीकडे, शनिवारी पारनेर शहर कडकडी बंद पाळण्यात आला. सकाळी 11 वाजता राळेगणसिद्धी येथे रस्ता रोको व त्या नंतर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने गावातील पुरुषांबरोबर महिला आणि शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकार कुठल्याही उपाययोजना करत नसल्याने सरकारचा निषेध ग्रामस्थांनी केला आहे.

 

अण्णा हजारे हे लोकपाल, लोकायुक्तची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी मागील 4 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

बातम्या आणखी आहेत...