आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anniversary Special : Amitabh Bachchan Shared The Reason For Marrying Jayaji, Shared A Funny Memory

Anniversary Special : अमिताभ बच्चन यांनी सांगितले जयजींशी लग्न करण्याचे कारण, शेअर केला एक मजेदार किस्सा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 46 वर्ष पूर्ण झाले आहेत. 3 जून 1973 ला त्यांनी लग्न केले होते. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बिग बींनी एक मजेदार किस्सा शेअर करून सांगितले की, अखेर का त्यांनी जयाजींशी 1973 मध्ये लग्न केले होते. बिग बींनुसार, ते, जया त्यांच्या मित्रांना सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी लंडनला जायचे होते. पण त्यांचे पिता हरिवंश राय बच्चन यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ते जयाजींसोबत तेव्हाच जाऊ शकतात जेव्हा त्यांचे लग्न झालेले असेल. ही ती वेळ होती जेव्हा अमिताभ आणि जया एकमेकांना डेट करत होते. 

 

अमिताभ यांना जपायचे होते आपले वचन... 
बिग बींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मित्रांना वचन दिले होते की, जे जंजीर चित्रपट हिट झाला तर ते लंडनला फिरायला जातील. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले, "मी पेरेंट्सला सांगितले की, आमचा पूर्ण ग्रुप लंडनला जात आहे. तर त्यांनी विचारले कोण कोण जात आहे ? नावे समोर आली ज्यामध्ये जयाचे नावदेखील सामील होते. त्यांनी विचारले, 'जयासुद्धा तुमच्यासोबत जात आहे का ?' मी म्हणालो - 'हो' यावर ते म्हणाले, 'आधी लग्न करा, मग जा." 

 

लग्नासाठी स्वतः कार चालवू इच्छित होते बिग बी... 
बिग बींनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिले, "मी लग्नाचे कपडे घातले होते आणि आपल्या कारमध्ये जाऊन बसलो. मालाबार हिलवर लग्न होते आणि मी कार चालवू इच्छित होतो. पण माझ्या ड्रायव्हर नागेशने मला ड्रायव्हींग सीटवरून हटवले आणि म्हणाला कि माझ्या लग्नात कार तोच चालवेल. जे त्यावेळी पारंपरिक घोड्याला पर्याय म्हणू होते. काही तासातच लग्न झाले आणि आम्ही पती-पत्नी बनलो." बिग बींनुसार, लग्नाच्या पहिल्याच रात्री दोघे लंडनला रवाना झाले होते.

 

अभिषेक बच्चनने दिल्या पेरेंट्सला शुभेच्छा... 
पेरेंट्सच्या वेडिंग एनिवर्सरीवर शुभेच्छा देत अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच लिहिले आहे, "आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो."

बातम्या आणखी आहेत...