आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Announce The Names Of Those Responsible For The Defeat Of Rohini Khadse, Do Not Capitalise OBC Injustice; Girish Mahajan's Challenge To Khadse

राेहिणी खडसे यांच्या पराभवाला जबाबदार लोकांची नावे जाहीर करा, ओबीसी अन्यायाचे भांडवल नकाे; गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये राेहिणी खडसे यांचा पराभव काेणीही केलेला नाही. तसे एकनाथ खडसे यांना वाटत असेल, त्यांच्याकडे पाडणाऱ्यांची पुराव्यानिशी माहिती असेल तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजेत. त्यांच्या आराेपात तथ्य नाही. स्वत: एकनाथ खडसे या मतदारसंघात यापूर्वी किती मतांनी निवडून आले हे अभ्यासले पाहिजे. या निवडणुकीत एक वेळ ते स्वत: उमेदवार असते तर निवडून आले असते, असे मत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

नवीन शासनाने सिंचन प्रकल्पांना स्थगिती दिली. यासंदर्भात महाजन पत्रकारांशी बाेलत हाेते. या वेळी भाजपमध्ये सुरू असलेल्या ओबीसी नेत्यांच्या माेटबांधणी व खडसेंच्या नाराजीविषयी त्यांना विचारले असता, त्यांनी खडसेंना पराभूत करणाऱ्यांची नावे थेट जाहीर करण्याचे आवाहन केले. एकनाथ खडसे यांना यापूर्वी मागील निवडणुकीत साडेआठ हजारांचे मताधिक्य मिळाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांना ताेडीची टक्कर दिली हाेती. चंद्रकांत पाटील मागील वेळीच जड पडले हाेते. या वेळी शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद मिळाल्याने त्यांचा विजय झाला. त्यामुळे कुणी ही जागा पाडली असा आराेप करण्यात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

अन्यायाचा विषयच नाही, मीदेखील ओबीसी....

भाजपतील ओबीसी नेत्यांकडून एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात माेट बांधली जात असून हे नेते पक्ष सोडण्याची शक्यता असल्याबद्दल विचारले असता, महाजनांनी यात तथ्य नसल्याचे सांगितले. ओबीसींच्या अन्यायाचा विषयच नाही. खडसे, मुंडे यांच्याप्रमाणे मीही ओबीसीच आहे. चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, आम्ही सर्व ओबीसी आहाेत, १०५ आमदारांमध्ये सर्वाधिक ओबीसी आणि बहुजन आहेत. भाजपत ओबीसीवर अन्यायाच्या आराेपाला जागा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

बातम्या आणखी आहेत...