आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अदनान सामीच्या पद्मश्री वादामध्ये अभिनेता आणि कॉमेडियन अन्नू कपूर यांनी पद्मश्री अवॉर्डबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये स्वतःला अयोग्य आणि नालायक की, 'पद्मश्री पुरस्कार योग्य आणि लायक लोकांना दिले जातात', त्यांनी हे ट्वीट एका ट्विटर यूजरच्या त्या प्रश्नावर उत्तर देताना लिहिले आहे. ज्यामध्ये विचारले गेले होते की, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला नाही पाहिजे ?
अन्नू कपूर यांनी उत्तरात हे लिहिले...
अन्नू कपूर यांनी उत्तरात लिहिले, "धन्यवाद भाऊ, पण पद्मश्री पुरस्कार केवळ योग्य आणि लायक लोकांना दिला जातो. माझ्या सारख्या अयोग्य आणि नालायकाला नाही. तरीही तुम्हाला माझी आठवण आली, यासाठी खूप आभारी आहे."
हे होते यूजरचे पूर्ण ट्वीट...
ट्विटर यूजरने प्रश्न केला होता, "चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध ग्रेट कॉमेडियन, अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक आणि रेडियो होस्ट परम आदरणीय अन्नू कपूर साहेब यांना पद्मश्री अवॉर्ड मिळायला हवा ? कृपया अवश्य वोट करा."
1983 मध्ये डायरेक्टर श्याम बेनेगलचा चित्रपट 'मंडी' ने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारे अन्नू कपूर यांनी अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटात 'मिस्टर इंडिया', 'सरदार', 'विक्की डोनर', 'जॉली एलएलबी', 'जॉली एलएलबी 2' आणि 'ड्रीम गर्ल' सामील आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.