आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनूप जलोटा म्हणाले - जसलीन माझी गर्लफ्रेंड नाही, तिच्या वडिलांच्या सांगण्यावरुन तिच्यासोबत बिग बॉसच्या घरात गेलो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क. भजन गायक अनूप जलोटा यांनी पुन्हा एकदा बिग बॉस आणि जसलीन मथारुसोबतच्या त्यांच्या रिलेशनविषयी स्पष्टीकरण दिले आहे. या संपुर्ण प्रकरणी त्यांनी जसलीन मथारु यांच्यावर निशाना साधला आहे. मी आणि जसलीनने एकत्रित बिग बॉसच्या घरात जावे अशी केसर मथारु यांची इच्छा होती. अन्यथा मला या शोमध्ये अजिबात इन्ट्रेस्ट नव्हता. 

 

इव्हेंटमध्ये केला खुलासा 
अनूप जलोटा यांनी एका इव्हेंटमध्ये सांगितले की, बिग बॉस सारखा शो त्यांच्या प्रायोरिटीमध्ये कधीच नव्हता. ते कधीच या शोकडे आकर्षित झाले नाहीत. त्यांनी सांगितले की, सलमान खानने मला या शोमध्ये येण्यास सांगितले होते आणि मी गेलो. मला या शोमध्ये एकटे जायचे नव्हती. याच दरम्यान माझी स्टूडेंट जसलीनचे वडील केस मथारु यांनी मला त्यांच्या मुलीसोबत या शोमध्ये जाण्याची विनंती केली. अनूप म्हणाले की, जसलीनचे वडील माझे चांगले मित्र आहेत म्हणून मी त्यांचे ऐकले आणि त्यांच्या लेकीसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. 

 

मला जे सांगण्यात आले तेच केले 
इव्हेंटदरम्यान अनूपने सांगितले की, बिग बॉसचा शो हा मसाल्याशिवाय चालत नाही. मला बिग बॉसने जे सांगितले तेच मी येथे केले. जसलीन माझी गर्लफ्रेंड आहे, हे स्पष्ट चुकीचे आहे. मी असे कधीही म्हणालो नाही आणि मी हे कधी जाहिरही केले नव्हते. अनूप म्हणाले की, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मला थोडे चांगले वाटत आहे. मला अशा ठिकाणी जाण्याचा शौक कधीच नव्हता. माझ्यासाठी भजन गायिकी पुरेसी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...