आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक बायोपिक : राणू मंडलच्या जीवनावर बनवणार चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झालेल्या राणू मंडल यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मितीची तयारी केली जात असल्याचे ऐकण्यात येत आहे. एका वृत्तानुसार रानू मंडल यांच्या आयुष्यावर तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ऋषिकेश मंडल करणार आहेत. ते या चित्रपटाची निर्मिती करण्यासोबतच याचे दिग्दर्शनही करतील. सप्टेंबरपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. सूत्रांनुसार, चित्रपटामध्ये रानू मंडल आणि गायक सिद्धार्थ राय काही गाण्यांना आपला आवाज देतील.

फिरोज खान यांच्या घरी करत होत्या काम 
यापूर्वी राणू चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते फिरोज खान यांच्या घरी काम करत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. फिरोज खान यांच्या घरी राहून त्या स्वयंपाक करण्यापासून ते साफसफाईची कामे करत होत्या. तसेच फिरोज खान यांचा अभिनेता मुलगा फरदीन खान व दिग्दर्शक भाऊ संजय खान यांची कामेही त्या करत होत्या.