एकेकाळी भाकरीच्या तुकड्यासाठी तरसणारी राणू आता स्टार झाली आहे
दिव्य मराठी वेब
Sep 08,2019 06:09:00 PM ISTएंटरटेन्मेंट डेस्क : पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन आपले पोट भरणारी राणू मंडल सध्या यशाच्या शिखरावर आहे. एकेकाळी भाकरीच्या तुकड्यासाठी तरसणारी राणू आता स्टार झाली आहे. आधी हिमेश रेशमियाने तिला आपला चित्रपट ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ साठी गाणे गाण्याची ऑफर दिली. ज्यानंतर प्रत्येकाने त्याचे कौतुक केले. त्यानंतर आता राणू मंडलला आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीची साथ मिळणार आहे आणि ती अभिनेत्री आहे राखी सावंत.
राखी सावंतने अशातच आपला म्यूझिक अल्बम 'छप्पन छुरी' च्या प्रमोशनमध्ये राणू मंडलच्या आवाजाचा उल्लेख केला. राखी सावंतने राणू मंडलच्या आवाजाचे कौतुक केले आणि तिला एक गाणेदेखील ऑफर केले. राखी सावंतची इच्छा आहे की, राणूने ‘छप्पन छुरी’ च्या रिमिक्स व्हर्जनला पाला आवाज द्यावा. एवढेच नाही राखीने पुढे म्हणाली, “ती अशा इंडस्ट्रीसोबत असल्यामुळे खुश आहे, जे राणू मंडल सारख्या प्रतिभाशाली लोकांचे समर्थन करतात आणि त्यांना पुढे जाण्याची संधी देतात. हिमेश रेशमियासारख्या गायकांचे मी मनापासून आभार मानते.'