आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षांची झाली अर्जुन कपूरची छोटी बहीण, सोशल मीडियावर बर्थडे विश करून भावाने लिहिले, \'तू माझे पूर्ण जग आहेस\', जान्हवी-खुशी आणि वडील बोनी कपूरसोबत साजरा केला अंशुलाने बर्थडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने नुकताच (29 डिसेंबर) तिचा वाढदिवस साजरा केला आहे, ती आता 26 वर्षांची झाली आहे. अर्जुनने छोट्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर करून इमोशनल मॅसेज लिहिला. त्याने लिहिले, 'हॅप्पी बर्थडे अंश, तू माझे एक्सटेंशन आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की, तू माझे संपूर्ण जग आहेस'. अर्जुनने जो फोटो शेयर केला आहे, त्यात जान्हवी-खुशी सुद्धा आहे. पूर्ण कापुर फॅमिली यावेळी सिंगापुरमध्ये आहे आणि सर्वजण तिथे न्यू ईयर सेलिब्रेट करणार आहेत. 

 

श्रीदेवीच्या निधनानंतर एकत्र आले कुटुंब...
श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन-अंशुला आपल्या सावत्र बहिणी जान्हवी-खुशीच्या जवळ आले. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर ही अशी पहिलीच वेळ आहे जेव्हा कपूर फॅमिली एकत्र न्यू ईयर सेलिब्रेट करणार आहे. 

 

चारही भाऊ बहिणींमध्ये आता पार्टीज, फंक्शन्स आणि वेडिंग सेरेमनीमध्ये खूप बॉन्डिंग पाहायला मिळते. एवढेच नाही जान्हवी आणि अर्जुन तर करन जौहरचा चॅट शो 'कॉफी विद करन' मधेही सोबत दिसले होते. 

 

कधी बहीण मानण्यासही दिला होता नकार... 
रिपोर्ट्सनुसार जेव्हा बोनी कपूरने पहिली बायको मोनाला सोडून श्रीदेवीसोबत लग्न केले होते. तेव्हा सर्वात जास्त अर्जुन कपूरच भडकला होता. तो हे म्हणाला होता की जान्हवी आणि खुशी त्याच्या बहिणी नाहीत. तो एका इंटरव्यूमध्ये म्हणाला होता, "खुशी आणि जान्हवीशी त्याचे कोणतेच नाते नाही. आम्ही लोक जास्त भेटत नाही आणि सोबत वेळी घालवत नाही. हे नाते माझ्यासाठी महत्वाचे नाही". एवढेच नाही त्याला श्रीदेवीदेखील आवडत नव्हत्या. तो श्रीदेवीसाठी म्हणाला होता की, त्या केवळ पिता बोनी कपूरच्या पत्नी आहेत.

 

अर्जुन, बोनी कपूरच्या पहिल्या पत्नी मोना कपूर यांचा मुलगा आहे. जून 1996 मध्ये बोनी कपूरने श्रीदेवी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. अर्जुन कपूरची आई मोना कपूरला फार दुःख झाले होते. श्रीदेवीसोबत लग्न झाल्यानंतर बोनी कपूर, मोना कपूरपासून दूर झाले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...