आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्कः आपल्या अभिनयासोबतच अनेक तरुणींसाठी फिटनेस आयकॉन असणारी अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. सुष्मिताचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबाद येथे झाला. 1994 मध्ये झालेल्या मिस युनिवर्स स्पर्धेत विजेतेपदाचा मान पटकावणारी सुष्मिता पहिली भारतीय महिला होती. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. या स्पर्धेत सुष्मिताला एक प्रश्न विचारला गेला होता, तो म्हणजे एका स्त्रीकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोण काय आहे? सुष्मिताने उत्तर देताना म्हटले होते, स्त्रीत्व ही देवाने दिलेली मोठी देणगी आहे. बाळाला स्त्री, आई जन्म देत असते. स्त्री पुरुषांना शेअरिंग, काळजी घेणे आणि इतरांवर प्रेम करायला शिकवते. हाच महिला असण्याचा सार आहे.
सुष्मिताने 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘सिर्फ तुम’, ‘बीवी नंबर 1’, ‘ऑंखे’, ‘मैं हू ना’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. दोन दत्तक मुलींची आई असलेल्या सुष्मिताने आतापर्यंत लग्न केलेले नाही. सुष्मिता सध्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असून ती लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. रोहम सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.