आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Antarctica And Greenland Snow To Melt 6 Times Faster By 2100, Threat To 400 Million People Living In Coastal Cities

2100 पर्यंत 6 पट वेगाने वितळणार अंटार्कटिका आणि ग्रीनलँडचा बर्फ, किनाऱ्यावर राहणाऱ्या 40 कोटी लोकांना धोका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1992 ते 2017 दरम्यान 6.4 हजार कोटी टन बर्फ वितळली, यामुळे समुद्रात 0.7 इंचाने वाढ झाली

वॉशिंग्टन- ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्कटिका आणि ग्रीनलँडचा बर्फ वेगाने वितळत आहे. 50 देशांमधील आंतरराष्ट्रीय संघटनांच्या शास्त्रज्ञांनी 11 सॅटेलाइट्सच्या मदतीने केल्ला सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. मागील 25 वर्षात (1992 ते 2017) मध्ये 6.4 हजार कोटी टन बर्फ वितळला आहे. यामुळे 0.7 इंच (17 सेंटीमीटर) समुद्र तळात वाढ झाली आहे. द आइसशीट मास बॅलेंस इंटरकम्पेरिजन एक्सरसाइजच्या शास्त्रज्ञांनी अंदाज लावला आहे की, 2100 पर्यंत इतका बर्फ वितळेल, की समुद्राच्या तळात 6.6 इंचाने वाढ होईल. यामुळे किनारपट्टीवरील शहरांमध्ये राहणाऱ्या 40 कोटी लोकांना धोका निर्माण झाला आहे.


वातावरणातील बदलामुळे ग्रीनलँडचदा 60% आणि अंटार्कटिकाचा 40% बर्फ वितळण्याचा धोका आहे. यामुळे समुद्र किनारा पाण्याखाली जाणे किंवा पूर येण्यासाऱ्या समस्या येऊ शकतात. कॅलिफोर्नियामधील नासाच्या जेट प्रपुल्शन लॅबोलेटरीतील एरिक आइविन्सने वातावरणातील बदलामुळे बर्फ वितळणे आणि समुद्रपातळी वाढ होण्यावर अभ्यास केले. त्यांनी याबाबत सांगितले की, कॉम्यूटरच्या मदतीने आणि सॅटेलाइटने अभ्यास करुन हा डाटा तयार करण्यात आला आहे. 

2300 पर्यंत 4 पट वाढू शकते समुद्र पातळी


नेचर जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ‘‘बर्फ खूप वेगाने वितळत आहे. यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होईल.’’ 2015 च्या पॅरिस क्लाइमेट गोलमध्ये शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, 2300 पर्यंत समुद्राची पातळी 4 पटीने वाढू शकते. यामुळे शांघाईपासून लंडनपर्यंत आणि बांग्लादेशपासून फ्लोरिडा, म्यांमार या देशांना सर्वात जास्त धोका आहे.

बातम्या आणखी आहेत...