आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड थांबवणाऱ्या अॅपला महिलांची पसंती, 2.3 लाख युझर्सनी केले डाउनलोड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो(जपान)- महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. म्हणून महिलांसोबत छेडछाड करणाऱ्यांना रोखण्यासाठी टोकियो पोलिसांनी एक स्मार्टफोन अॅप बनवले आहे. या अॅपला जापानच्या महिलांची चांगलीच पसंती मिळत आहे. येथील महिलांना रेल्वे प्रवासादरम्यान अनेक वेळा छेडछाड होत होती, पण त्यांना काहीच करता येत नव्हते. पण आता त्यांच्या सुरक्षेसाठी अँटी ग्रॉपिंग अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.


छेडछाड झाल्यावर महिला डिजी पोलिस अॅपची मदत घेऊ शकतात, या अॅपद्वारे एक संदेश 'स्टॉप इट' (याला थांबवा) किंवा मोबाइलवर एसओएस (इमरजंसी कॉन्टॅक्टला सूचना) असा संदेश दिसतो. या संदेशात लिहलेले असते की, येथे एक मोलेस्टर (छेडछाड करणारा) आहे, कृपया मदत करा. या संदेशाद्वारे पीडिता जवळपास असलेल्या लोकांचीही मदत घेऊ शकते. पोलिस अधिकारी केइको टॉयमाइन यांनी सांगितले की, या अॅपला आपण 2.37 लाखपेक्षा अधिक वेळेस डाउनलोड करू शकता.


अॅपची लोकप्रियता वेगाने वाढत आहे.
टॉयमाइन यांच्या माहितीनुसार, या अॅपची लोकप्रियता वेगाने वाढत आहे, आणि दरमहिन्याला जवळपास 10 हजार नवे युझर्स हे अॅप  डाउनलोड करत आहेत. त्यामुळे कोणत्याही पब्लिक सर्विस अॅपच्या हिशोबाने हा निश्चितच मोठा आकडा आहे. त्यांनी सांगितले की, पीडीत महिला मदत मागण्यासाठी घाबरतात. पण, एसओएस संदेश मोडचा उपयोग करून इतर प्रवाशांना न सांगतासुद्धा छेडछाड करण्याऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देऊ शकतात.


टोकियो मॅट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या ताजा आकड्यानुसार, 2017 मध्ये टोकियोमध्ये रेल्वे आणि सबवेवर जवळपास 900 छेडछाडीचे आणि इतर अत्याचाराचे घटना समोर आल्या आहेत. पण वास्तविक संख्या यापेक्षा जास्त असू शकते, कारण बऱ्याच वेळा याला बळी पडलेले लोक समोर येत नाहीत.


जापानमध्ये अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला सहा महिन्याचा कारावास किंवा 5,हजार 500 डॉलर (3.83 लाख रूपये) पर्यंत दंड देण्यात येतो. अत्याचार किंवा धमकावल्यावर 10 वर्षांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूद आहे.
 

भारतामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये टॉक बॅक बटन लावले आहे 
प्रवासादरम्यान महिलांना होणाऱ्या असुविधा आणि अडचणीना लक्षात घेऊन रेल्वे आता एक नवी सुविधा देत आहे. भारतीय रेल्वे लवकरच महिलां प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या महिला डब्यात एक बटन लावणार आहे. या बटनाचे नाव टॉक बॅक बटन आहे. सध्या रेल्वे याला पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवत आहे. तसेच याची गरज लक्षात घेऊन ही सुविधा सर्व रेल्वेमध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...