आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी नोकर बनून येतो अाणि डल्ला मारून जातो..बऱ्याचदा पकडला गेला परंतु एकदाही झाली नाही शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- पोलिसांनी एका अनोख्या 'नटवरलाल'ला जेरबंद केले आहे. कमलेश उर्फ जयंतीलाल ओसवाल (26) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने शहरातील 7 राजस्थानी लोकांच्या घरी चोऱ्या केल्या. या घरांतून त्याने जवळपास 4 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा ऐवज चोरला आहे. सुरत स्टेशनवर आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्याने सर्व गुन्हे कबूल केले आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, आरोपी वेसू भागातील स्विम पॅलेसमध्ये एक व्यापाऱ्याच्या घरातून 40 लाखांचे दागदागिने चोरुन पसार झाला होता. चोरी केल्यानंतर तो अहमदाबादला गेला होता. तिथे रेल्वे स्टेशनवरील लॉकरमध्ये चोरीच्या वस्तु ठेवून तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. पोलिसांनी आरोपीकडून 36 लाखांचे दागिने जप्त केले असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.

 

नोकरीवर ठेवल्यानंतर 3 तासां‍तच 40 लाखांचे दागिने चोरुन फरार झाला आरोपी

> आरोपी कमलेशने 24 ऑक्टोबरला वेसू भागातील स्विम पॅलेसमध्ये राहणाऱ्या विमल बेडिया यांच्या घरी गेला होता. तुमच्याकडे नोकर म्हणून कामाला ठेवा, अशी विनंती त्याने केली होती.  बेडिया यांनी त्याला 24 ऑक्टोबरला कामावर घेतले. घरात घुसल्यानंतर त्याने अवघ्या 3 तासांतच बेडिया यांच्या घरातील 40 लाखांचे दागिने लांबविले. त्यान एक सोन्याचा हार, दोन ब्रेसलेट, दोन कानातले डूल, तीन हीऱ्यांच्या बांगड्या, रत्नजडीत सोन्याची अंगठी आदी दागिन्यांचा त्यात समावेश होता.

 

कामावर ठेवून घेण्याची विनंती करुन घरात प्रवेश करत होता आरोपी कमलेश

> आरोपी कमलेश व्यापाऱ्यांना आपण राजस्थानी असल्याचे सांगून त्याला काम देण्याची विनंती करत होता. नोकरी मिळाल्यानंतर तीन दिवसांतच तो चोरी करुन फरार होत होता. दरवेळी चोरी केल्यानंतर तो अहमदाबादला जाऊन तिथे रेल्वेच्या लॉकरमध्ये चोरीचे सामान ठेवत होता.

 

अनेक नावांचे ओळखपत्र दाखवून

>  कमलेशने अनेक नावांचे ओळखपत्र बनवून गरज भासल्यास तो नाव बदलत होता. संशय येऊ नये म्हणून तो चोरी केलेले दागिने त्याच दुकानात विकत होता जिथून ते खरेदी केलेले असायचे. पकडल्यानंतर पोलिसांना त्याने कमलेश यादव अशी आपली ओळख सांगितली. पोलिसांची दिशाभूल करण्याचाही त्याने प्रयत्न केला. त्याने 4 लाखांचे दागिने सिलिगुडीमध्ये विकल्याचे सांगितले.

 

सुरत स्टेशनवरून फरार होत असताना पोलिसांनी पकडले 

>  वेसूमधून 40 लाखांचे दागिने चोरी केल्यानंतर आरोपी कमलेश सुरतवरुन अहमदाबादला पोहचला. तिथून तो भोपाळला गेल्यानंतर परत इंदूरला पोहचला. इंदूरहून परत अहमदाबादला आल्यानंतर त्याने रेल्वेच्या लॉकरमध्ये चोरीचे दागिने ठेवले. त्यानंतर तो शनिवारी सकाळी 11 वाजता दागिने घेऊन सुरत स्टेशनवर येणार असल्याचे पोलिसांना समजले. तिथे त्यांनी सापळा रचून त्याला पकडले.

 

वडिलांनी घरातून हाकल्यानंतर निवडला चोरीचा मार्ग

>  राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यात राहणारा कमलेश उर्फ जयंतीलाल ओसवाल याची चोर होण्यामागची कहानी फारच गंमतीदार आहे. एकदा त्याने त्याच्या गावातील एका व्यापाऱ्याच्या घरी चोरी केली. चोरी पकडल्यानंतर गावातील लोकांनी त्याला बेदाम चोप दिला होता. वडिलांना समजल्यानंतर त्यांनी त्याला घरातून हाकलून लावले. तेव्हापासून कमलेशच्या मनात राजस्थानी लोकांविषयी द्वेष निर्माण झाला आणि बदला घेण्याच्या हेतूने त्याने चोरीचे पाऊल उचलले.

बातम्या आणखी आहेत...