आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anu Malik Gets Angry Over The Question Of Returning To 'Indian Idol', Gets Angry And Cut The Phone

'इंडियन आयडल' मध्ये परतण्याच्या प्रश्नावर भडकले अनु मलिक, रागात कट केला फोन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : म्यूझिक डायरेक्टर अनु मलिकवर मागच्यावर्षी #MeToo कॅम्पेन अंतर्गत हरॅसमेंट्चा आरोप केला गेला होता. यानंतर त्याला सिंगिंग रिअलिटी शो 'इंडियन आयडल 10' मधून काढले गेले होते. आता चर्चा आहे की, ते आता पुन्हा या शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसणार आहे. जेव्हा दैनिक भास्करने हे कन्फर्म करण्यासाठी मलिक यांच्या संपर्क केला तर ते भडकले.  
 

अनु मलिक म्हणाले - हे चॅनलला विचारा... 
अनु मलिकने भडकून म्हणले, "हे बघा, हा प्रश्न रूमही चॅनलला विचारला पाहिजे. मला नाही. मला याबद्दल काहीही बोलायचे नाही. माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुमच्या प्रश्नांची उत्तरे चॅनल देऊ शकते." यापूर्वी की, आम्ही आणखी काही विचारू शकू, त्यांनी रागात फोन काट केला. मलिकवर सिंगर सोना मोहपात्रा, श्वेता पंडित आणि अलीशा चिनॉय यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यांच्याव्यतिरिक्त सोशल मीडियावरदेखील दोन महिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.  
 

सध्या काय आहे नवीन चर्चा... 
अनु मलिकशी निगडित एका जवळच्या सूत्राने सांगितले, "त्यांच्यावर लागलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. चॅनलने त्यांना 'इंडियन आयडल 11' मध्ये घेण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली आहे. त्यांनी आपल्या लीगल डिपार्टमेंटसोबत चर्चा केली आणि अनेक मीटिंग्सनंतर निर्णय घेतला आहे की, अनु यांना पुन्हा शोमध्ये आणण्यात काहीही हरकत नाही. हो, चॅनल यावेळी या गोष्टीमुळे घाबरलेले आहेत की, अनु यांच्या परतण्याने काही गोंधळ होऊ शकतो. ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत ते पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध बोलू शकतात. ज्यामुळे शोला निगेटिव्ह पब्लिसिटी मिळू शकते. मात्र ते या सर्व निगेटिव्हिटीजशी लढण्यासाठी तयार आहे."

बातम्या आणखी आहेत...