आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex वाइफने अनूप जलोटा आणि जसलीनच्या नात्यावर दिली प्रतिक्रिया, अनूप यांची शिष्याच होती पुर्वाश्रमीची पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 65 वर्षीय भजन गायक अनूप जलोटा आणि 28 वर्षीय जसलीन माथारु यांनी बिग बॉसच्या प्रीमिअरवेळी रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आणि चर्चांना उधाण आले. दोघांच्या या नात्याविषयी आता अनूप जलोटांची पुर्वाश्रमीची पत्नी सोनाली राठौरची प्रतिक्रियी आली आहे. स्पॉटबॉय या एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सोनाली राठौरने जसलीन आणि अनूप जलोटांच्या नात्याविषयी बातचित केली. सोनाली प्रतिक्रिया देताना म्हणाली, मी बिग बॉस 12 पाहिले नाही आणि मला माझ्या पुर्वाश्रमीच्या पतीविषयी काही बोलायची इच्छादेखील नाही.


सोनाली म्हणाली... 
- सोनालीने मुलाखतीत म्हटले, 'मी माझ्या आयुष्यात आता खूप पुढे गेली आहे आणि मी माझ्या आयुष्यात अतिशय आनंदी आहे.' 

-  अनूप जलोटांविषयी सोनाली म्हणाली, ' प्रोफेशनल असो वा पर्सनल लाइफ, मी अनूप यांना त्यांच्या आयुष्याविषयी शुभेच्छा देते.' 

 

पळून जाऊन केले होते सोनाली आणि अनूप जलोटांनी लग्न..
अनूप जलोटा आणि सोनाली राठौर (माहेरचे आडनाव सेठ) यांनी पळून जाऊन लग्न केले होते. सोनाली अनूप यांच्याकडे संगीत शिकायला येत होती. त्याचकाळात दोघांमध्ये सूत जुळले. दोघे लग्न करु इच्छित होते, पण सोनाली गुजराती होती, त्यामुळे तिचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. काही काळ सोबत राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. अनूप जलोटांपासून विभक्त झाल्यानंतर सोनालीने गायक रुपकुमार राठौरसोबत लग्न केले होते. 

बातम्या आणखी आहेत...