अनूप जलोटाच्या Girlfriend / अनूप जलोटाच्या Girlfriend ने आपल्याच वडिलांच्या Adult चित्रपटात केले काम, अनुपम खेरांच्या भावासोबत दिले Bold Scene

Oct 01,2018 11:29:00 AM IST

मुंबई - बिग बॉस 12 मध्ये आलेले भजन सम्राट अनूप जलोटा (65) आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन कौर (28) सध्या चर्चेत आहेत. शोच्या प्रीमियरमध्ये खुद्द जलोटा आणि जसलीन यांनी आपण रिलेशनशिपमध्ये आहोत असे जाहीर केले होते. जसलीन एक मॉडेल आणि आपली शीष्या असल्याचे जलोटा यांनी सांगितले होते. परंतु, कदाचित अनेक लोकांना माहिती नसेल की जसलीनने आपलेच वडील केसर मथारू यांच्या बी-ग्रेड चित्रपटात काम केले आहे.


निर्माता जसलीनचा सख्खा भाऊ, 2016 मध्येच झाला रिलीझ
हा चित्रपट 2016 मध्ये रिलीझ झाला होता. तसेच यामध्ये लीड अॅक्टर अनुपम खेरचे भाऊ राजू खेर (61) होते. जसलीनपेक्षा 33 वर्षांनी मोठे असलेले राजू यांनी तिच्यासोबत चित्रपटात बोल्ड सीन केले होते. फिल्मचे लेखक आणि दिग्दर्शक केसर मथारू होते. तर मथारू यांचा मुलगा आणि जसलीनचा सख्खा भाऊ कंवलजीत मथारू या चित्रपटाचा निर्माता होता. जसलीनने चित्रपटात गाणे गाताना डान्स सुद्धा केले होते. सेन्सॉर बोर्डाकडून A सर्टिफिकेट मिळवलेला हा चित्रपट केसर यांनी आपल्या मुलीला लाँच करण्यासाठी बनवला होता.


जलोटासोबत रिलेशनशिपवर काय म्हणाले वडील?
केसर मथारू यांनी जसलीन आणि अनूप जलोटा यांच्या नात्यावर आधीच आपली प्रतिक्रिया दिली आहे. 3 ते 4 वर्षांपूर्वी जसलीनने अनूप जलोटा यांची भेट करून दिली होती. कारण, ती त्यांच्याकडून संगीत शिकू इच्छित होती. एका मुलाखतीमध्ये जसलीनचा ब्रिटनमध्ये बॉयफ्रेंड आहे का अशी विचारणा करण्यात आली होती. जसलीनच्या त्या प्रियकरामुळे जलोटा यांच्यासोबत मतभेद देखील झाल्याची चर्चा होती. त्यावर जसलीनचा असा कोणताही प्रियकर नाही असे वडील म्हणाले होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की "आम्ही अतिशय मुक्त विचारांचे लोक आहोत. माझा मुलगा आपल्या गर्लफ्रेंड संदर्भात कुटुंबियांशी चर्चा करतो. जसलीनचा बॉयफ्रेंड असल्यास तिने आमच्यासोबत चर्चा केली असती. परंतु, तिने ब्रिटनच्या बॉयफ्रेंडचा कधीही उल्लेख केला नाही." जसलीनने अनूप यांच्यासोबत रिलेशनशिपबद्दल कुटुंबियांना सांगितले नाही, कारण त्यांच्यात वयाचे खूप मोठे अंतर होते असे तिचे वडील म्हणाले होते.

X