आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Karwachauth 2018 Special: Bollywood Singer Anup Jalota Spend 16 Crores Rupees To Save Wife Life: Anup Wife Died In Operation Theater

करवाचौथ स्पेशल: बिग बॉस कंटेस्टेंटने पत्नीचा जीव वाचवण्यात खर्च केले होते 16 कोटी, ऑपरेशन दरम्यान झाला होता मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'बिग बॉस' सीजन 12 चे कंटेस्टेंट भजन गायक अनूप जलोटा शोमध्ये नेहमीच आपल्या पर्सनल लाइफविषयी खुलून बोलताना दिसतात. शोचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अनूप, जसलीनला आपली तिसरी पत्नी मेधा गुजरालचा आजार आणि मृत्यूविषयी सांगत आहेत. अनूप सांगतात की, माझ्या मुलाच्या जन्माच्या काही वर्षांनंतर माझ्या पत्नीच्या हार्टच्या मसल्सने काम करणे बंद केले होते. डॉक्टर्स म्हणाले होते की, हार्ट ठिक होऊ शकत नाही. हार्ट ट्रान्सप्लांट करावे लागेल. ही ट्रीटमेंट करण्यासाठी 15-16 कोटी रुपये खर्च झाले होते आणि माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. 

 

अमेरिकेत सुरु होता अनूपच्या पत्नीवर उपचार 
- अनूप व्हिडिओमध्ये सांगतात की, "त्या काळात भारतात हार्ट ट्रान्सप्लांटची टेक्नॉलॉजी नव्हती. अशा वेळी माझ्या पत्नीला अमेरिकेत नेले. अमेरिकेत तीन-चार वर्षे फे-या मारल्यानंतर पत्नीचे हार्ट आणि किडनी दोन्हीही ट्रान्सप्लांट झाले."
- "माझ्या पत्नीची बॉडी हे ट्रान्सप्लांट सहन शकली नाही, तिचा ऑपरेशन थिएटरच्या टेबलवरच मृत्यू झाला."
- अनूप यांनी सांगितले की, "मी माझे अनेक वर्षे बायकोच्या हेल्थमध्येच घालवले. तेव्हा माझा मुलगा भारतात होता. मी त्याला भेटण्यासाठी महिन्यातून दोन वेळा भारतात यायचो."
- अनूप यांनी तीन लग्न केले आहेत. दोन पत्नींसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान राहिलेले आयके गुजराल यांच्या भाचीसोबत लग्न केले होते. 2014 मध्ये त्यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता. 

 

पळून जाऊन केले होते पहिले लग्न 
- अनूप जलोटा यांच्या पर्सनल लाइफविषयी बोलायचे झाले तर त्यांनी पहिले लग्न गुजराती मुलगी सोनाली सेठसोबत केले होते. या लग्नासाठी त्यांच्या घरचे तयार नव्हते. 
- दिर्घकाळ एकत्र राहिल्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अनूप यांनी बीना भाटियासोबत अरेंज मॅरेज केले. पण हे लग्नही जास्त दिवस टिकू शकले नाही, नंतर हे दोघं वेगळे झाले.
- अनूपने तिसरे लग्न पंतप्रधान राहिलेले आईके गुजराल यांची भाजी मेधा गुजरालसोबत केले. ती बॉलिवूड डायरेक्टर शेखर कपूर यांची पहिली पत्नी होती. अनूप-मेधा यांना एक मुलगा आहे. त्याने नाव आर्यमन आहे. 1996 मध्ये त्याचा जन्म झाला होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...