आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉसमध्ये असताना होती जिच्यासोबत अफेअरची चर्चा, त्याच जसलीनचे कन्यादान करणार अनुप जलोटा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू दोघेही गेल्या वर्षी बिग बॉसद्वारे खूप चर्चेत राहिले. आता जसलीनचे लग्न होणार असून अनुप तिचे कन्यादान करण्यासाठी तयार आहेत. ते म्हणतात....‘मी जसलीनसाठी कन्यादान करेल. ती माझ्या मुलीसारखी आहे. कुणी माझ्याबद्दल काय म्हणेल, याची मला परवा नाही. साधू-संत आदरणीय असतात, पण मी साधू नाही. तर मी आपल्या कामाची साधना करतो. मी जसलीनसोबत एक चित्रपटही करत आहे, यात जसलीन माझी विद्यार्थिनी असेल. मी तिला संगीताचे शिक्षण देत एक आर्टिस्ट बनवतो.’

मी केवळ संगीतामुळे युवकांमध्ये लोकप्रिय झालो आहे. शाळकरी मुले व युवक मला बिग बॉसमध्ये पाहिल्यानंतर भजन ऐकतील. मेनस्ट्रीम शोमध्ये भाग घेतल्यानंतर आता युवकांशी थेट संवाद साधत आहे. शोच्या माध्यमातून नवीन प्रेक्षक तयार करता येतात. मोठ्या कष्टाने मी हे यश मिळवले आहे. असेही अनुप जलोटा म्हणाले. 
 

बातम्या आणखी आहेत...