आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होय मी भक्त आहे! जेएनयू हिंसेनंतर आंदोलनकर्त्यांचे समर्थन करणा-यांवर भडकले अभिनेते अनुपम खेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः देशात सध्या सुरू असलेल्या अराजक वातावरणामुळे अनुपम खेर यांचा संताप भडकला आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी देशवासियांना आवाहन केले आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम यांनी जेएनयू हिंसाचारानंतर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, हे तेच लोक आहेत जे नोकरी, लिंचिंग यासारख्या मुद्द्यांवरूनही सरकारला घेराव घालत आहेत.

अनुपम यांचे आवाहन: अनुपम खेर यांनी व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शन लिहिले आहे ज्यात ते म्हणाले आहेत- जेव्हा देशातील काही लोक देशाची अखंडता बिघडवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे होऊ न देणे आपले कर्तव्य बनते. गेल्या काही दिवसांपासून अशा घटकांद्वारे असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे तेच लोक आहेत जे सर्वात जास्त इन्टॉलरेंट आहेत. म्हणूनच आम्हाला संयम, चिकाटी आणि अशा लोकांना एकत्रित येऊन सांगावे लागेल की, भारत हा आपला देश, आपले अस्तित्व आणि आपले सामर्थ्य आहे. आम्ही त्याला विखरु देणार नाही. जय हिंद !!

अनुपम व्हिडिओमध्ये म्हणाले-
गेल्या काही वर्षांत काही खास लोकांनी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. या लोकांनी असहिष्णुता, लिंचिंग सारख्या मोहिमा राबवून सरकारविरूद्ध वातावरण निर्माण केले आहे. जेव्हा त्यांना या प्रकरणांवर काहीही करता आले नाही, तेव्हा हे काही लोक विद्यार्थ्यांच्या आड होऊन त्यांचा वापर करून आपल्या देशाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांना देशाच्या सैन्याशी त्रास आहे, ते राष्ट्रगीतासाठी उभे राहावे की नाही यावर भाषणे देतात. दहशतवाद्यांना फाशीपासून वाचवण्यासाठी त्यांनी मध्यरात्री सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. विद्यार्थी चळवळींमध्ये ते फ्री काश्मीरचे पोस्टर्स लावतात. हे काही लोक देशाची बदनामी करीत आहेत, आपण त्यांना असे करु देणार नाही. ते स्वतःचे रक्षण करण्यासाठी आम्हाला बर्‍याच नावांनी बोलवतात. होय आम्ही भक्त आहोत, आम्ही आपल्या देशाचे भक्त आहोत. मला माहित आहे की आपण त्यांचे हेतू पूर्ण होऊ देणार नाही. वंदे मातरम्, जय हिंद.