आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anupam Kher Defended Tapasi And Bhumi, Saying "I Am Proud That They Did These Roles"

अनुपम खेर यांनी केला तापसी आणि भूमीचा बचाव, म्हणाले - 'मला गर्व आहे की, त्यांनी या भूमिका साकारल्या'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'सांड की आंख' मध्ये भूमी पेडनेकर आणि तापसी पन्नू यांनी साकारलेल्या वयस्कर महिलांच्या भूमिकांवर झालेल्या वादामध्ये वेटरन अॅक्टर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खेर यांनी तापसी आणि भूमीचा बचाव करत सांगितले की, त्यांची निंदा करणे चुकीचे आहे, मला यामध्ये काहीच तर्क दिसत नाही. एवढेच नाही त्यांनी चित्रपटातील भूमिकांबद्दल दोन्ही अभिनेत्रींचे कौतुकदेखील केले. 26/11 हल्ल्यावर आधारित अनुपम यांचा आगामी चित्रपट 'होटल मुंबई' 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.  

अभिनयाचा अर्थ असतो कोणतेही पात्र उत्तम पद्धतीने साकारणे - अनुपम खेर... 
अशातच रिलीज झालेला चित्रपट 'सांड की आंख' ने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. या चित्रपटात वयस्कर महिलांच्या भूमिका साकारत असलेल्या भूमी पेडनेकर आणि तापसी पन्नूला अनेक निंदकांचा सामना करावा लागला. वेटरन अॅक्ट्रेस सोनी राजदान आणि नीना यांच्यासह कंगना रनोटची बहीण रंगोलीने वयस्कर महिलांचे रोल भूमी आणि तापसीला ऑफर झाल्याबद्दल प्रश्न केले होते. याप्रकरणी भूमी आणि तापसीचे समर्थन करत अनुपम म्हणाले की, आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर येऊन कलाकृती साकारणे कलाकाराचे काम असते. ही निंदा चुकीची आहे. मला यामध्ये काहीही लॉजिक दिसत नाही. अॅक्टिंगचा अर्थच हा असतो की, कोणतीही भूमिका उत्तम पद्धतीने साकारणे. 

आपल्या अनुभवाबद्दल अनुपम खेर म्हणाले की, त्यांनी पहिल्या चित्रपटात 28 वर्षांचे असूनही 65 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. जर तेव्हा लोकांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले होते तर आता का नाही. अनुपम खेर, भूमी आणि तापसीचे कौतुक करत म्हणाले, "मी सांड की आंख चित्रपट पहिला नाहीये. पण दोन्ही मुलींवर गर्व आहे की, त्यांनी हे रोल केले." वयाच्या हिशेबाने कास्टिंगबद्दल झालेल्या वादामध्ये सोनी राजदान आणि नीना गुप्ता यांनीदेखील तापसी आणि भूमीला रोल मिळाल्याने आपली नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही अॅक्ट्रेस कंगना रनोटची बहीण रंगोलीने तर चित्रपटामुळे तापसी आणि भूमीची खूप खिल्ली उडवली होती. अनुपम खेर यांनी तापसी आणि भूमीचा बचाव करत लिहिले की, "जर सोनी आणि नीना असा विचार करत असतील ठरते चुकीचे आहे. हे कोणते समीकरण आहे की, वयस्कर व्यक्तीचा रोल सिनियर अॅक्टरकडूनच करून घेतला पाहिजे."

बातम्या आणखी आहेत...