आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

63 वर्षीय अनुपम खेर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख, अनेक प्रयत्न करुनही पुर्ण होऊ शकली नाही इच्छा, किरण खेरने स्वतः केला होता खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते मुंबईच्या काही गरीब मुलांना आपले मित्र असल्याचे सांगत आहेत. व्हिडिओमध्ये अनपम खेर यांची मुलांसोबत विशेष बॉन्डिंग पाहायला मिळते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनुपम खेर यांना स्वतःचे मुल नाही. 63 वर्षांच्या अनपम खेर यांनी अनेक मुलाखतींमध्ये मान्य केले आहे की, त्यांना त्याच्या मुलांची खुप कमतरता भासते. 2013 मध्ये एका मुलाखतीत अनुपम म्हणाले होते की, "सिकंदर(किरण खेर आणि त्यांचा पहिला पती गौरम बैरीचा मुलगा) तेव्हा चार वर्षांचा होता, तेव्हा तो माझ्या जवळ आला आणि तो मला खुप प्रेम आणि सन्मान देतो. जसे माझे वडील माझ्या सोबत वागत होते, तसाच मी त्याच्यासोबत राहतो. पण मला माझ्या स्वतःच्या मुलांची कमतरता भासते हेसुध्दा खरे आहे. मला ही कमतरता भासते. पण मी काहीच करु शकत नाही."


मेडिकल हेल्प घेऊनही होऊ शकले नाही मुलं 
- अनुपम आणि किरणने खुप प्रयत्न केले. पण त्यांना बाळ होऊ शकले नाही. स्वतः किरणने 2003 मध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, "आम्ही खुप प्रयत्न केले. कारण सिकंदरला एका भाऊ/बहीणची गरज होती. पण हे होऊ शकले नाही. मेडिकल हेल्पचाही काहीच फायदा होऊ शकला नाही."


1985 मध्ये केले होते लग्न 
- किरण आणि अनुपम यांची पहिली भेट चंडीगडमध्ये झाली होती. तिथे दोघं थिएटर ग्रुपमध्ये एकत्र होते. पण नंतर 1980 मध्ये किरण चंडीगड मधून मुंबईत आल्या. त्यांचे पहिले लग्न बिझनेसमन गौतम बैरीसोबत झाले. 1981 मध्ये त्यांचा मुलगा सिकंदरचा जन्म झाला आणि याच्या चार वर्षानंतर किरण यांना या लग्नात काही तरी दोष वाटू लागला. असे बोलले जाते की, अनुपम यांचे पहिले लग्न कुटूंबाच्या दबावात येऊन 1979 मध्ये मधुमालती नावाच्या मुलीसोबत झाले होते, पण ते लग्नामुळे आनंदी नव्हते. ज्यावेळी किरण आणि अनुपम नादिरा बब्बरच्या प्लेसाठी कोलकत्ता येथे गेले तेव्हा त्यांची पुन्हा भेट झाली. या भेटीनंतर अनुपमने किरणला प्रपोज केले. यानंतर दोघांच्या भेटीगाढी होऊ लागल्या. दोघांनी आपल्या पार्टनर्सला घटस्फोट दिला आणि 1985 मध्ये लग्न केले. अनुपमने किरण खेर यांचा मुलगा सिकंदरला स्विकारुन स्वतःचे नाव दिले. 

 

33 कोटींचे मालक आहेत अनुपम खेर 
- अनुपम खेर यांची बायको किरण खेर 2014 मध्ये बीजेपीच्या तिकीटावर खासदार बनल्या. तेव्हा त्यांनी सबमिट केलेल्या एफिडेविटमध्ये आपली आमि अनुपमची एकुण 33.5 कोटी संपत्ती डिक्लेयर केली होती. एफिडेविटनुसार अनुपम खेर यांच्याकडे 42.6 लाखांची BMW कार आहे. या कारसाठी त्यांनी इंडिया फायनेंशियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून 17.64 लाखांचे लोन घेतले होते. यासोबतच त्यांनी 20-20 टेलीव्हिजन कंपनीकडून 1.21 लाखांचे बिझनेस लोन घेतले होते. अनुपम यांनी 1984 मध्ये आलेल्या 'सारांश' चित्रपटातून डेब्यू केला. आतापर्यंत त्यांनी 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदान पाहून भारत सरकारने त्यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानिक केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...