आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या रक्तात हिंदुस्तान आहे', अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या 'जोकर'वाल्या टीकेला अभिनेते अनुपम खेर यांचे प्रत्युत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीएए आणि एनआरसीचे समर्थन केल्यामुळे नसीरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांना 'जोकर' संबोधले होते

बॉलिवूड डेस्क- सीएए आणि एनआरसीचे समर्थन केल्यामुळे नसीरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांना 'जोकर' म्हटले होते. त्याला अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करुन उत्तर दिले आहे. अनुपम यांनी आज शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले की, ''तुम्ही मला जोकर म्हटले. तसेच, माझ्या मतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही म्हटले. तुम्ही म्हणालात की, हे सगळ माझ्या रक्तात आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की, माझ्या रक्तात हिंदुस्तान आहे. 


नुंकतच, 'द वायर'ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सीएए आणि एनआरसीचा विरोध करत अभिनेते अनुपम खेर यांच्यावर टीका केली होती. नसीरुद्दीन म्हणाले होते की, 'अनुपम खेर याप्रकरणी खूप बोलत आहेत. पण मला वाटत नाही की, त्यांना गांभीर्याने घेतले पाहीजे. ते एक जोकर आहेत. एनएसडी आणि एफटीआयआयमध्ये त्यांच्यासोबत शिकलेले लोक त्यांच्या चापलुसीवाल्या स्वभावाबद्दल सांगू शकतात. हे गोष्ट त्यांच्या रक्तातच आहे. पण, इतर लोकांनी या गोष्टीचे समर्थन करायचे का नाही, हे ठरवले पाहीजे." 

अनुपम यांचे उत्तर- तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करता, त्यामुळेच तुम्हाला चुक आणि बरोबरमधील अंतर कळत नाही

व्हिडिओत अनुपम म्हणाले की, "जनाब नसरूद्दीन शाह साहेब, तुमचा इंटरव्ह्यू पाहीला. तुम्ही माझ्याबाबत काही टीप्पणी केली की, मी जोकर आहे, मला गांभीर्याने घेण्याची गर नाही, मी साइकोपॅट आहे, या गोष्टी माझ्या रक्तातच आहे, वगैर-वगैर...या कौतुकासाठी धन्यबाद. पण मी तुमच्या मतांना आणि तुम्हालाही गांभीर्याने घेत नाही. मी कधीच तुमच्याबद्दल वाईट बोललो नाही. पण, आता तुमच्याबद्दल बोलू इच्छितो की, संपूर्ण आयुष्य इतके नाव कमवूनही तुमचे आयुष्य एकटेपणात गेले आहे. तर दिलीप कुमार, अमिताभ बच्चन को, राजेश खन्ना, शाहरुख खान, विराट कोहली यांच्यावर टीका करू शकतात, तर मला वाटत मी चांगल्या लोकांच्या संगतीत आहे. विशेष म्हणजे, यापैकी एकानेही तुमच्या मतांना गांभीर्याने घेतले नाही. आम्हाला माहित आहे की, अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करत आहात, त्यामुळेच तुम्हाला चुक आणि बरोबर कळत नाही. माझ्याबद्दल वाईट बोलून तुम्हाला नाव कमवायचे असेल तर करा....जय हो।"  

बातम्या आणखी आहेत...