आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anupam Kher Said We Have Rahul Gandhi In Opposition, Who Does Not Stays In The Country

अनुपम खेर म्हणाले - आपल्याकडे विरोधी पक्षात राहुल गांधी आहेत, जे देशात राहातच नाहीत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रतिष्ठित टीव्ही कार्यक्रमात पोहोचलेले अभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान मोदी यांचे खूप कौतुक केले आहे. अनुपम खेर म्हणाले की, "मला मोदीजींना सपोर्ट केल्यामुळे ट्रोल केले जाते. जे आतापर्यंतचे सर्वात चांगले ट्रोलिंग आहे." यासोबतच खेर कलम 370 सह अनेक राजकीय मुद्द्यांवर बोलले. अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये चंदीगड येथून विजयी झाल्या आहेत.  


पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत अनुपम खेर म्हणाले की, मोदींनी भारतीय राजकारणाची भूमीच बदलली आहे, त्यांचा विजय याचा पुरावा आहे." दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कामही नैराष्यकारक असल्याचे अनुपम खेर म्हणाले. ते म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी आम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न दाखवले पण तेदेखील बाकीच्या राजकीय नेत्यांप्रमाणे बदलले, अखेर का मनीष सिसोदिया व्यतिरिक्त सर्वांची त्यांची साथ सोडली."


काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीबद्दल अनुपम खेर म्हणाले की, "आपल्याकडे विरोधी पक्षात राहुल गांधी आहेत, जे जे देशात राहताच नाहीत. जर तुम्ही मला यावर ट्रोल करू इच्छित तर करा. मी पीएम मोदी यांना सपोर्ट केल्यामुळे ट्रोल होतो आणि हे सर्वात चांगले ट्रोलिंग आहे." यासोबतच अनुपम खेर यांनी कलम 370 बद्दलदेखील मनमोकळ्या गप्पा मारल्या. ते म्हणाले की, धारा 370 हटवणे मुस्लिम, काश्मिरी आणि शिखांसाठी चांगले आहे, कारण आता ते भारताच्या सुविधांचा सर्वसामान्यांप्रमाणे लाभ घेऊ शकतील. हे चुकीचे आहे की, हे 70 वर्षे चालवले गेले. कारण हे कलम भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याला हिरावत होते. 

बातम्या आणखी आहेत...