आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुपम खेर यांनी शेअर केला 'विजय'च्या सेटवरचा फोटो, वयाच्या 33 व्या वर्षी झाले होते 7 वर्षांनी मोठ्या हेमा मालिनीचे वडील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवुड डेस्कः बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर करुन इंट्रेस्टिंग माहिती दिली आहे. हा फोटो 1988 मध्ये रिलीज झालेल्या 'विजय' या चित्रपटाच्या सेटवरील असून यात राजेश खन्ना, हेमा मालिनी, अनिल कपूर, ऋषी कपूर, राज बब्बर आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या भूमिका होत्या. रंजक गोष्ट म्हणजे या चित्रपटात अनुपम खेर यांनी त्यांच्यापेक्षा वयाने सात वर्षांनी मोठ्या असलेल्या हेमा मालिनीचे वडील, तीन वर्षांनी मोठे असलेले राज बब्बर यांचे वडील आणि 13 वर्षांनी मोठ्या राजेश खन्ना यांच्या सास-यांची व्यक्तिरेखा वठवली होती.  

अनुपम खेर यांनी फोटोसोबत लिहिले,“हा फोटो यश चोप्रा यांच्या ‘विजय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काढला गेलेला आहे. तेव्हा मी अवघ्या 33 वर्षांचा होतो. या चित्रपटात मला ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे वडील, सुपरस्टार राजेश खन्ना यांचे सासरे आणि अनिल कपूर यांच्या आजोबांची भूमिका साकारावी लागली होती.”  त्यांनी पुढे लिहिले, "प्रत्यक्षात ही भूमिका भारतीय चित्रपटसृष्टीचे सच्चे अभिनेते दिलीप कुमार साहेब करणार होते. मी स्वतःला भाग्यवान समजले होते." चित्रपटात अनुपम खेर यांच्या नातवाची भूमिका साकारणारे ऋषी कपूर त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठे तर अनिल कपूर केवळ दोन वर्षांनी लहान आहेत.   

  • यश चोप्रांचा हिट न झालेला चित्रपट...

यश चोप्रा  त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'विजय' या चित्रपटाला प्रेक्षकांना सर्वात कमी पसंतीस पडलेला चित्रपट समजायचे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. अनेक समीक्षकांनी या चित्रपटावर टीका करत हा चित्रपट यश चोप्रांच्या 'त्रिशुल' या चित्रपटाचा रिमेक असल्याचे म्हटले होते. त्रिशुलमध्ये अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि संजीव कुमार यांच्या भूमिका होत्या.