आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म पहिल्यानंतर अनुपम खेर यांच्याशी भांडली त्यांची आई, पहिले झाल्या नाराज मग रागात म्हणाल्या, \'मला कळत नाही कुणी अशी अॅक्टिंग करते का\'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनुपम खेर यांची फिल्म 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' रिलीज झाली आहे. फिल्मचे एकीकडे खूप कौतुक होत आहे तर दुसरीकडे अनुपम खेर यांची आई फिल्म पाहिल्यानंतर मुलासोबत भांडल्या आहेत. अनुपम खेर यांनी आपल्या आईचा एक व्हिडीओ बनवून शेयर केला आहे, ज्यामध्ये त्यांची आई त्यांच्या अभिनयाबद्दल त्यांची मज्जा घेत आहे. मजेशीर पद्धतीने रिव्यू देत अनुपम खेर यांच्या आई दुलारी खेर म्हणाल्या, 'काय करतोस तू मला कळाले नाही'. यावर अनुपम खेर म्हणाले, 'अॅक्टिंग करतो'. तर आई म्हणाल्या, 'अशी कुणी अॅक्टिंग करते का' यांनतर अनुपम यांनी आईला प्रश्न विचारला, 'तुम्हाला फिल्म आवडली की नाही'. यावर त्या म्हणाल्या, ''मलाच नाही, सर्वानाच आवडली''. तसेच मनमोहन सिंह यांचे कौतुक करत दुलारी खेर म्हणाल्या, ''ते खूप सज्जन व्यक्ती आहेत. दुरूनच सज्जन दिसतात, पण लोक मात्र सज्जन माणसाला मूर्ख समजतात. त्यांना नसते माहित की अशी माणसे खूप हुशार असतात''. यांनतर अनुपम यांनी आईला विचारले, 'तुम्ही माझी फिल्म पहिली तर मला 100 मधून किती मार्क्स देणार'. यावर दुलारी खेर म्हणाल्या, '100 मधून 100' मग अनुपम खेर म्हणाले, 'हॅप्पी' तर त्यादेखील म्हणाल्या, 'हॅप्पी'.  

 

फिल्म 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' 2014 मध्ये याच नावाने आलेल्या पुस्तकावर बेस्ड आहे. हे पुस्तक माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी लिहिले आहे. फिल्म विजय गुट्टेने डायरेक्ट केली आहे. यामध्ये संजय बारू यांचा रोल अक्षय खन्ना, प्रियंका गांधी यांचा रोल अहाना कुमरा, सोनिया गांधी यांचा रोल सुजैन बर्नेट आणि राहुल गांधीच रोल अर्जुन माथुर यांनी केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...