आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 व्या अॅनिव्हर्सरीला अनुपम खेर यांनी शेअर केले लग्नाचे फोटो, लिहिले - 'वाटते जसे कालचीच गोष्ट आहे'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. 64 वर्षीय अनुपम यांनी सोशल मीडियावर वेडिंग फोटो करून  किरण यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, "प्रिय किरण लग्नाच्या 34 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्यातील खूप मोठा काळ आपण सोबत घालवला आहे. 34 वर्षे पूर्ण झाली, पण वाटते जशी कालचीच गोष्ट आहे, मी त्या खास क्षणांवर खूप प्रेम करतो, जे आपण सोबत जगलो आहे."
 

   

1985 मध्ये झाले होते लग्न... 
रिपोर्ट्सनुसार, अनुपम आणि किरण यांची पहिली भेट तेव्हा झाली होती, जेव्हा दोघे चंडीगड थिएटर ग्रुपचा भाग होते. त्यावेळी किरण विवाहित आणि एका मुलाची आई होत्या. मात्र त्या त्यांच्या लग्नापासून खुश नव्हत्या. एकदा त्या आणि अनुपम, नादिरा बब्बरच्या प्लेसाठी कोलकाताला गेल्या होत्या. तिथेच  अनुपम यांनी किरणला प्रपोज केले. दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि मग 1985 मध्ये किरण यांनी गौतमपासून घटस्फोट घेऊन अनुपम यांच्याशी लग्न केले.  
 
 
 

दाम्पत्याला भासते स्वतःच्या आपत्याची उणीव
गौतम आणि किरण यांचा मुलगा सिकंदरला अनुपम स्वतःच्या मुलाप्रमाने वागावतात. पण त्यांचे दोघांचे स्वतःचे असे मूल नाहीये. अनुपम यांनी अनेकदा मान्य केले आहे की, त्यांना स्वतःच्या आपत्याची खूप उणीव भासते. 2013 च्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, "सिकंदर चार वर्षांचा होता जेव्हा माझ्याकडे आला होता. तो मला खूप प्रेम आणि सन्मान देतो. जसे वर्तन वडिलांचे माझ्यासाठी होते, तसेच माझेही सिकंदरसाठी आहे. पण हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, मला माझ्या स्वतःच्या मुलाची उणीव भासते. मला हे जाणवते. पण मी काहीच करू शकत नाही." 
 
 
 

मेडिकल हेल्पदेखील कामी आली नाही... 
किरणने 2013 मध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. "आम्ही खूप प्रयत्न केला कारण सिकंदरला एका भाऊ किंवा बहिणीची गरज होती. पण हे शक्य होऊ शकले नाही. एवढेच नाही तर मेडिकल हेल्पचाही काही फायदा झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...