आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टक्कल पडलेल्यांचे दुःख सांगणारे अनुपम खेर यांचे मजेशीर गाणे, म्हणाले- ' ऐ मेरे बिछडे बालों, फिर से उग आओ सालों'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 64 वर्षीय अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक गमतीशीर गाणे शेअर केले आहे. हे गाणे ते स्वत: गाताना दिसत आहेत. वास्तविक, हे गाणे 'काबुलीवाला' या चित्रपटातील 'ऐरे मेरे प्यारे वतन' या गाण्याचे विडंबन आहे, या गाण्यातून ते  केस गमावलेल्या आणि टक्कल पडलेल्यांचे दुःख सांगत आहेत. अनुपम यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "जगभरातील टकल्या लोकांना समर्पित हे माझे भावपूर्ण गाणे." गाण्याचे बोल काहीसे असे आहेत, "ऐ मेरे बिछडे बालों, फिर से उग आओ सालों... तुम पे मैं कुर्बान।"

ट्विटवर येत आहेत मजेशीर कमेंट 

ट्विटर यूजर्सना हे गाणे खूप आवडले असून ते यावर मेजशीर कमेंट देत आहेत. एका यूजरने लिहिले की, "बाल विवाह ठीक होते ... आता लग्न होईपर्यंत केस शिल्लक राहात नाही." दुसर्‍या यूजरने लिहिले, "तुम्ही काय म्हणत आहात हे मला माहिती नाही, परंतु हे ऐकिव झाले आहे." आणखी एका यूजरने म्हटले, "आपल्या 'अनुपम' व्यंग्यात  आता टक्कल पडलेल्यांची 'खेर' राहणार नाही." एका यूजरने लिहिले, "केस नसल्याचे दुःख समजून घ्या, टक्कल पडलेली व्यक्ती कॉस्मेटिक शॉपवर उभी आहे, डोक्यावर केस नाहीत, पण कंगवा मागत आहे. टक्कल पडण्याचे फायदे आहेत, पावसात केस ओले होत नाहीत. बी पॉझिटिव्ह. काहीही होऊ शकते."