आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे अनुराधा पौडवाल यांची स्टायलिश लेक, बॉलिवूडमध्ये मिळत नाही काम, अशी करते कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 90s मधील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल गेल्या अनेक वर्षांपासून म्यूझिक वर्ल्डपासून दूर आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. 27 अक्टोबर 1952 रोजी त्यांचा जन्म झाला. आज त्या वयाची 66 वर्षे पुर्ण करत आहेत. अमिताभ बच्चन आणि जया यांच्या अभिमान या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या अनुराधा यांनी जवळपास 12 वर्षापूर्वी 'जाने होगा क्या'(2006) चित्रपटात गाणे गायले. फार कमी लोकांना माहीती आहे की अनुराधा यांच्या मुलीचे नाव कविता आहे. बॉलिवूडमध्ये मिळाले नाही काम... आज आपण त्यांच्य वाढदिवसानिमित्त त्यांच्या लेकीविषयी जाणून घेऊया. 

 

- कविता एक उत्तम सिंगर आहे पण मिळालेल्या माहितीनुसार तिला बॉलिवूडमध्ये काम मिळत नाहीए.
- आतापर्यंत कविताने एकही बॉलिवूड गाणे गायले नाही. सध्या ती आईप्रमाणेच भक्तीगीते गाते.
- कविताने आतापर्यंत 16 भक्ती अल्बम काढले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हेच कविताचे इनकम सोर्स आहे.
- इतकेच नाही तर आईप्रमाणे कविता फेमसही नाही. गरबा दांडीया यांसारख्या लहान इवेंट्समध्ये ती गाणे गाते.
- कविताचे सोशल मीडिया अकाउंट अशाच छोट्यामोठ्या कार्यक्रमांनी भरलेले आहे.

 

गुलशन कुमारसोबत अफेअर असल्याच्या होत्या चर्चा...
- अनुराधा पौडवालने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर भक्तीगीतेही गायली आहेत. त्यांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत लग्न केले होते जे एसडी बर्मन यांचे असिस्टंट आणि म्यूझिक कंपोजर होते. 
- दोघांनी दोन मुले झाली. आदित्य पौडवाल आणि कविता पौडवाल. अरुण पौडवाल यांचा मृत्यू 1991 साली झाला त्यानंतर अनुराधा यांचे नाव टी-सीरीजचे गुलशन कुमार यांच्यासोबत जोडले गेले.
- अनुराधा यांनी जवळपास 10 वर्षे टी-सीरीजसाठी काम केले. अनुराधा यांनी हिंदीशिवाय पंजाबी, बंगाली, मराठी, तमिल, तेलुगु, उडिया आणि नेपाली भाषेत गाणे गायले.

 

ही आहेत अनुराधा यांची गाजलेली गाणी..
'तू मेरा हीरो है...' (हीरो), 'कह दो कि तुम हो मेरी वरना...' (तेजाब), 'तेरा नाम लिया तुझे याद किया...' (राम लखन), 'नजर के सामने...' (आशिकी), मुझे नींद न आए...' (दिल), 'दिल है कि मानता नहीं...' (दिल है कि मानता नहीं), 'बहुत प्यार करते हैं...' (साजन), 'धक-धक करने लगा...' (बेटा) ही अनुराधा यांची गाजलेली गाणी आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कविता पौडवालचे काही खास फोटोज्...
 

 

बातम्या आणखी आहेत...