आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलर्सने दिली फिल्ममेकर अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली मदतीची याचना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आनंदी आहेत. त्यांना देश-विदेशातील लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलेब्सने देखील सोशल मीडियाद्वारे मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये फिल्ममेकर अनुराग कश्यपचे नाव देखील आहे. पण शुभेच्छा देतांना त्यांनी मोदींकडे एक तक्रार केली आहे. 

 

अनुरागने ट्विटरवर लिहिले की, 'प्रिय नरेंद्र मोदी सर, तुम्हाला या विजयाबद्दल आणि सर्वांना या विजयात समाविष्ट करून घेतल्याबद्दल तुमचे आभार. सर प्लीज तुम्हीच सांगा, तुमचे चाहते विजयाचा आनंद साजरा करताना माझ्या मुलीला धमकी देत आहेत तर त्यांचे काय करावे.' अनुरागची मुलगी आलियाला ट्विटरवर ट्रोल करताना काही लोग तिला शिवीगाळ करत तिच्यावर बलात्कार करण्याच्या धमक्या देत आहेत. अनुरागने याच ट्वीटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे. 

 

अनुरागच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे आलिया
अनुराग नेहमीच आपल्या मुलीचे फोटो शेअर करत असतात. 17 वर्षीय आलिया अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजची मुलगी आहे. 2003 मध्ये अनुराग आणि आरतीचा विवाह झाला होती. पण 2009 मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. यानंतर अनुरागने 2011 मध्ये अभिनेत्री कल्कि कोचलिनसोबत लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघे वेगळे झाले. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करा.....

बातम्या आणखी आहेत...