Home | Gossip | Anurag Kashyap deleted his Twitter account, expressing his disappointment in the last post

अनुराग कश्यपने आपले ट्विटर अकाउंट केले डिलीट, शेवटच्या पोस्टमध्ये अशी व्यक्त केली नाराजी 

दिव्य मराठी वेब, | Update - Aug 11, 2019, 02:37 PM IST

अकाउंट डिलीट करण्यापूर्वी अनुरागने केले दोन ट्विट 

  • Anurag Kashyap deleted his Twitter account, expressing his disappointment in the last post

    एंटरटेन्मेंट डेस्क : प्रत्येक मुद्द्यावर बेडरपणे आपले मत मांडणारा लेखक, निर्माता आणि दिगदर्शक अनुराग कश्यपने ट्विटर सोडले आहे. अनुरागने शनिवारी रात्री सुमारे 9 वाजता दोन ट्वीट केले आणि त्यानंतर त्याने आपले ट्विटर अकाउंट डिलीट केले. अनुराग कश्यप म्हणाला होता की, त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्या मिळत आहेत. अनुरागने आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये लिहिले, "जेव्हा तुमच्या आई वडिलांना फोन येऊ लागतात. तुमच्या मुलीला ऑनलाइन धमक्या येत आहे आहेत. कारण तुम्हाला माहित आहे की, कुणी याबद्द्लबोलू इच्छित नाही. चोर राज्य करत आहेत आणि चोरी करणे आयुष्य जगण्याची नवी पद्धत झाली आहे."

    अनुरागने आपल्या दुसऱ्या आणि शेवटच्या ट्वीटमध्ये ट्विटर बंद करण्याचे कारण सांगितले, अनुरागने लिहिले, "तुम्हा सर्वांच्या आनंद आणि यशासाठी प्रार्थना करतो. ट्विटर सोडल्यानंतर हे माझे शेवटचे ट्वीट असेल. जर मला न घाबरता आपल्या मनातील गोष्ट बोलण्याची परवानगी नसेल, तर मी अजिबात बोलणार नाही. अलविदा."

Trending