Home | National | Delhi | Anurag Kashyap support to Nitin Gadkari for PM seat

पंतप्रधान पदासाठी गडकरींच्या नावाची परत एकदा चर्चा: नितीन गडकरी पंतप्रधान म्हणून उत्तम पर्याय- अनुराग कश्यप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 07:26 PM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची पुन्हा जोरदार चर्चा

  • Anurag Kashyap support to Nitin Gadkari for PM seat


    नवी दिल्ली- देशाच्या पंतप्रधान पदासाठी एनडीकडून नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा आहे. पण यातच आता परत एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावीची चर्चा होताना दिसत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने या चर्चेत भर टाकली आहे. अनुरागने ट्वीट करून नितीन गडकरी पंतप्रधान पदासाठी उत्तम पर्याय असल्याचे त्यात म्हटले आहे.

    नितीन गडकरी यांच्या विकासकामांचे अनेकांनी कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी संसदेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी गडकरींचे कौतुक केले होते. तेव्हापासून पंतप्रधान पदासाठी गडकरींच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता अनुरागच्या ट्वीटने या चर्चांना परत सुरुवात केली आहे.

Trending