आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकीदाराची नोकरी करणाऱ्या अभिनेत्याविषयी म्हणाला अनुराग कश्यप - तीनवेळा काम दिले आहे, आता त्याला आपली मदत स्वतःच करावी लागेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अनुराग कश्यपची फिल्म 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये काम केला अभिनेता सवी सिद्धू सध्या सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत आहे. सिद्धूची फायनान्शिअल कंडीशन इतकी खराब इतकी खराब आहे की, त्याच्याकडे बसचे भाडे देण्याचेही पैसे नाही. दोनवेळच्या अन्नासाठी सिद्धू सध्या मुंबईच्या एका अपार्टमेंटमध्ये चौकीदाराची नोकरी करत आहे. सवी सिद्धूने काही दिवसांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये आपल्या वाईट परिस्थितीविषयी सांगितले होते. सवीच्या अशा परिस्थितीची माहिती जेव्हा अनुराग कश्यपपर्यंत पोहोचली तेव्हा तोही याबद्दल बोलला.

तीनवेळा सवीला काम दिले आहे...
अनुराग कश्यपने सवीबद्दल एकानंतर एक ट्वीट केले. अनुरागने लिहिले, ''जगात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्याकडे काम नाही. एक कलाकार म्हणून सवी सिद्धूचा आदर करतो आणि त्याला तीनवेळा मी माझ्या चित्रपटांमध्ये काम दिले आहे. मी त्याचा आदर करतो कारण तो त्या व्यक्तींमध्ये आहे, ज्याने बेरोजगार होण्यापेक्षा किंवा दारूमध्ये स्वतःचे आयुष्य बरबाद करण्यापेक्षा आपले आयुष्य सन्मानाने जगण्याचा निर्णय घेतला.''

कुणाला सहानुभूती म्हणून काम देणे त्याला अपमानित करण्यासारखे...
अनुरागने पुढे लिहिले, "नवाजुद्दीन एकेकाळी चौकीदाराचे काम करत होता. मी स्वतः वेटरचे काम केले आहे. मी एका अशा अभिनेत्यालाही ओळखतो, जो रस्त्यावर भेळ पुरी विकून आपले गुजराण करायचा. फिल्म 'ब्लॅक फ्रायडे' च्या अशाही एक अभिनेत्याला मी ओळखतो जो रिक्षा चालवतो." मी 'हम पांच' आणि 'खेल खिलाड़ी का' अशा चित्रपटांत काम केलेले अभिनेते उदय चंद्रा यांना दारोदारी ठोकरा खतांनाही पहिले आहे. हे जगातील कित्तेक लोकांचे सत्य आहे आणि असे भविष्यात माझ्या किंवा इतर कुणासोबतही होऊ शकते. मात्र कोणत्याची कलाकाराला सहानुभूती म्हणून काम देणे त्याचा अपमान करण्यापेक्षा कमी नाही."

सवीला स्वतःच करावी लागेल आपली मदत... 
अनुराग म्हणाला, ''सवी सिद्धूला आपली मदत स्वतःच करावी लागेल. सवीसाठी जर कुणी काही करू शकते तर ते इतकेच की, त्याला कास्टिंग डायरेक्टर्सची भेट घडवून द्यावी म्हणजे त्याला एखादा रोल मिळू शकेल. त्यांनतर जसे लाखो लोक काम शोधतात तसे सवीलाही शोधावे लागेल. मला सवीचा गर्व आहे की, त्याने कलाकाराची प्रतिमा खराब होऊ दिली नाही आणि तो खरंच काम करत आहे.'' अनुराग म्हणाला, ''मी अनेक अशा रायटर्सना ओळखतो जे उधार घेऊन काम चालवतात. अनेक असे फिल्ममेकर्स आहेत जे अनेकदा जेवणासाठी मला पैसे मागायचे.''

मदत कोणतीही कला किंवा कलाकाराला जन्म देऊ शकत नाही...
अनुरागनुसार, "चौकीदारी एक जॉब काम आहे आणि मी या कमला लहान किंवा मोठे मनात नाही. निदान सवी भीक तर मागत नाही ना. मी मानतो की मदत किंवा दान दिल्याने कलाकार किंवा कला जन्म घेऊ शकत नाही. सवी सिद्धू सारख्य अशा अनेक माहित नसलेल्या कहाण्या आहेत.''

अनुरागने सांगितला सवीला मदत करण्याचा मार्ग...
अनुरागने पुढे सांगितले, ''जर तुम्ही खरंच एखाद्या कलाकाराची मदत करू इच्छित तर त्याचे काम पहा आणि त्यासाठी त्याला मोबदला द्या. मला त्या कलाकाराविषयी सांगितल्याने आणि ट्वीट केल्याने त्याची हेल्प होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक नवीन कलाकारांसोबत काम केले आहे आणि आता नवीन टॅलेंट शोधतो.''

अशा वाईट परिस्थिती आहे सवी सिद्धू...
बता दें कि सवी लखनऊचा आहे आणि त्याचे शालेय शिक्षण तिथेच झाले आहे. त्यानंतर ग्रॅजुएशनसाठी तो चंडीगडला आला होता. याचदरम्यान त्याला मॉडेलिंगची ऑफर मिळाली. काकाही दिवस मॉडेलिंग केली. मग लॉच्या शिक्षणासाठी ती परत लखनऊला गेला. जेव्हा भावाला मुंबईमध्ये नोकरो मिळाली तेव्हा त्याचेही येथे येणे जाणे सुरु झाले. त्याने मुंबईमध्ये स्ट्रगल केले आणि याचदरम्यान अनुराग कश्यपसोबत फिल्म 'पांच' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण ही फिल्म चित्रपटगृहात अजूनही रिलीज होऊ शकली नाही. मात्र, त्यानंतर त्याला अनेक चित्रपटांत छोटे- छोटे रोल मिळाले. सवीने इंटरव्यूमध्ये सांगितले, 'माझ्याकडे कामाची कमी नव्हती. अनेकदा तर मी स्वतःच काम कार्याला नकार देत होतो आणि अनेकदा तब्येत बारी नसल्याचे कारण सांगत होतो. असे करत करत माझे काम सुटले आणि फायनान्शिअल आणि हेल्थ प्रॉब्लम्स वाढल्या. मग मला काम मिळणेच बंद झाले." सवीने  गुलाल, ब्लॅक फ्रायडे आणि पटियाला हाउस चित्रपटांत काम केले आहे. 

There are so many actors out there who don’t have work. I respect Savi Siddhu as an actor and have cast him thrice when he earned the role. I respect him that he chose to live his life with dignity and picked a job unlike so many entitled out of work actors who have either

— Anurag Kashyap (@anuragkashyap72) March 19, 2019

2... become alcoholics or wasted themselves away. Nawaz used to be a watchman, I used to be a waiter, I met one actor who sells bhelpuri on streets, I know and actor from Black Friday who drives a rickshaw, the lead from Salaam Bombay used to do the same ..

— Anurag Kashyap (@anuragkashyap72) March 19, 2019
बातम्या आणखी आहेत...