आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क - चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर वादग्रस्त ट्वीट केले आहे. कश्यपने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'आमचा गृहमंत्री भित्रा आहे, स्वतःचे पोलिस, स्वतःचेच गुंडे, स्वतःचीच सेना आणि सुरक्षा स्वतःची वाढवतो आणि निःशस्त्र आंदोलकांवर हल्ला करवतो. इतिहास थुंकले या प्राण्यावर.' अमित शाह यांच्या रॅलीदरम्यान तरुणाला झालेल्या मारहाणीनंर अनुरागने हे ट्वीट केले आहे.
वादग्रस्त ट्वीटकेल्यानंतर कश्यपने अशा अनेक लोकांच्या ट्वीटला रीट्विट केले, ज्यांनी शाह यांच्या त्या रॅलीमध्ये झालेल्या घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच एका पत्रकारने कश्यपला चांगल्या भाषेत निषेध नोंदवण्याचा सल्ला दिला, तेव्हा कश्यपने आपला बचाव करत 'अजीत अंजुम जी, गृहमंत्र्यांच्या रॅलीमध्ये एका तरुणाला त्यांच्यासमोर मारहाण करत आहे आणि त्यावेळी अमित शाह फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. आमची सुरक्षा या गृहमंत्र्याच्या हातात आहे ? ज्या भाषेत त्यांना समजते, तिच भाषा मी बोलत आहे. त्यामध्ये काय अपशब्द आहे."
शाह यांच्या निवडणूक रॅलीमध्ये गोंधळाचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, तो 8 फेब्रुवारीचा आहे. दिल्लीमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान शाह भाषण करत असताना गर्दीत असलेला एक तरुण अचानक एनआरसी आणि सीएएच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहे. त्यानंतर भाजपा समर्थक त्याला मारहाण करायला सुरुवात करतात. तेव्हा शाह मंचावरूनच लोकांना समजावून संगत त्या व्यक्तीला सोडण्याची अपील करतात, सोबतच सेक्योरिटीला लवकर जाऊन त्याला सकुशल घेऊन जायला सांगतात.
कश्यप सुरुवातीपासूनच सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) च्या प्रखर विरोधात आहे आणि याबद्दल अनेकदा आपला विरोध नोंदवला आहे. तसेच गृहमंत्र्यांविरुद्ध याप्रकारच्या भाषेचा वापर केल्यानंतर सोशल मीडियावर कश्यपची खूप निंदादेखील झाली आहे आणि अनेक यूजर्स त्याच्यावर भडकले. अनेक युजर्सने त्याला तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.