आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anushka Gets Emotional After Hearing One Incidence Of Virat Kohli's Life, Holds His Hand And Kisses On It

विराट कोहलीच्या आयुष्यातील हा किस्सा ऐकून इमोशनल झाली अनुष्का, पतीचा हात हातात घेऊन केले किस 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांचे पती पत्नीचे बॉण्डिंग खूपच स्पेशल आहे. त्यांच्या फोटोज आणि व्हिडीओजमधून बऱ्याचदा त्यांचे हे बॉण्डिंग झळकत असते. अशातच सोशल मीडिया अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीयांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटच्या हातावर किस करताना दसते आहे. हा व्हिडीओ फिरोज शाह कोटला स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटच्या आहे, जेथे फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव लावले गेले. या इव्हेंटदरम्यान घोषणा केली गेली की, स्टेडियममध्ये विराट कोहलीच्या नावरही एक अनावरण केले जाणार आहे. इव्हेंटदरम्यान डीडीसीए अध्यक्ष रजत शर्मानेदेखील एक प्रसंग सांगितला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, एकदा माजी अर्थमंत्री अरुण जेटली, विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्याच्या घरी गेले होते. 
 

  रजत शर्माने पुढे सांगितले, विराट कोहलीला त्यावेळी अंडर 19 मध्ये मॅच खेळायची होती आणि वडिलांच्या निधनानंतरही विराट कोहलीने मॅचमध्ये चांगले प्रदर्शन केले. याच गोष्टीने प्रभावित होऊन अरुण जेटली हे म्हणाले होते की, एके दिवशी विराट खूप नाव कमवेल. स्टेडियममध्ये हा किस्सा ऐकून विराट भावुक झाला, याचवेळी अनुष्काने विराटचा हात घट्ट पकडला, त्याला सांभाळून त्याचे अश्रू पुसले आणि नंतर त्याच्या हातावर किस केले. हे दृश्य खरंच एवढे प्रेमळ आणि गोड होते की, तुम्हालाही त्या दोघांचे कौतुक वाटेल. 

बातम्या आणखी आहेत...