आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8.5 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर मिळाला सुखद अनुभव, अनुष्काने फोटो शेअर करुन सांगितली संपूर्ण कहाणी  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसमवेत सध्या भूतानमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. येथेच 5 नोव्हेंबर रोजी अनुष्काने विराटचा 31 वा वाढदिवस साजरा केला.

येथे दोघेही ट्रेकिंगचा आणि निसर्गाचा आनंद घेत आहेत. अनुष्का आणि विराट यांनी येथील सुटी एन्जॉय करतानाचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या स्टार कपलला येथे एक सुखद अनुभन आला.  अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आणि विराट एका कुटुंबासमवेत बसून हसताना दिसत आहेत. फोटोचे कॅप्शन लिहिताना, अनुष्काने संपूर्ण कहाणी सांगितली आहे. अनुष्काने हा फोटो शेअर करत लिहिले की, '8.5 किलोमीटरची ट्रेकिंग केल्यानंतर आम्ही डोंगरांमधील एका गावात थांबलो जिथे एका घराच्या मालकाने आम्हाला विचारले की, थकले असाला तर चहा घेणार का ? त्या कुटुंबातील सदस्यांना माहित नव्हते की आम्ही दोघे कोण आहोत? असे असूनही, ते आम्हाला खूप प्रेमळपणे भेटले. तेच खूप खास होते.'  

बातम्या आणखी आहेत...