आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या एका वर्षानंतर विराट कोहलीने विचारले - आपल्या नात्यामध्ये काय स्पेशल आहे ? अनुष्का शर्मा म्हणाली - \'काही नाही\', व्हिडीओ होत आहे व्हायरल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा एक जाहिरात व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दाखवले गेले आहे की, विराट अनुष्काची किती काळजी घेतो. विराट स्वतः आपल्या हाताने अनुष्कासाठी कॉफी बनवून आणतो आणि जेव्हा अनुष्का कॉफी पिते तेव्हा विराट तिला मध्येच टोकतो.  विराट म्हणतो की, कॉफी गरम आहे आणि तिचे ओठ त्यामुळे जळू शकतात. त्यानंतर तो फुंकर मारतो आणि अनुष्का प्रेमाने त्याच्याकडे बघत राहते.  

विराटने विचारले, आपल्या नात्यामध्ये काय खास आहे...?
- व्हिडिओमध्ये पुढे विराट अनुष्काला म्हणतो, "लोक विचारतात की, आपल्या नात्यामध्ये काय खास आहे ?" पण याच्या उत्तदाखल अनुष्का म्हणते, "काही नाही." हे ऐकून विराटचे मन तुटते. पण अनुष्का जेव्हा म्हणते "प्युअर लव्ह". तेव्हा विराटचा चेहरा लगेच खुलतो. जाहिरातीच्या नाकाही एका व्हिडिओमध्ये अनुष्का विराटला पाय मारून त्याच्या पहिल्या मॅचचा फोटो दाखवते आणि विराट तिला तिच्या पहिल्या फिल्मचा फोटो दाखवतो. यादरम्यान दोघेही आपल्या डेब्यूचे अनुभव शेयर करू लागतात आणि म्हणतात, "एक्सपीरियंस खूप गरजेचा असतो." अनुष्का आणि विराटने डिसेंबर 2017 ला इटलीमध्ये लग्न केले होते. 

विरुष्काचे वर्कफ्रंट... 
- जर अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती 'बुलबुल' नावाची एक वेब सीरीज प्रोड्यूस करत आहे. को-प्रोड्यूसर तिचा भाऊ कारनेश शर्मा आहे. अनुष्का शर्माचा पती आणि इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळत आहे. याव्यतिरिक्त तो आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या तयारीमधेही व्यस्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...