आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'परी' चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण, अनुष्का म्हणाली - मला या व्यवसायात काही चांगल्या लोकांची साथ मिळाली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री अनुष्का शर्माचा चित्रपट 'परी'ला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अनुष्काने याची निर्मिती आपला भाऊ कर्णेश शर्मासोबत मिळून केली होती. त्यांचे बॅनर 'क्लीन स्लेट फिल्म्स' अंतर्गत हा चित्रपट बनवला हाेता. याविषयी ती म्हणते, एक कलाकार आणि एक निर्माता म्हणून नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मी कोणत्याच प्रकारच्या दबावाखाली आले नाही, प्रत्येक वेळेस मी काही तरी नवीन करण्याचा आणि नाट्यमय रूपाने करण्याचा आनंद घेत राहिले. माझ्या कामाची पद्धत या गोष्टीचा पुरावा आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला या व्यवसायात चांगल्या लोकांची साथ मिळाली आणि मी एक पायरी पुढे चालत गेले.

अनुष्का पुढे सांगते, 'परी'च्या स्क्रिप्टने मला प्रभावित केले. त्यानंतर मी हॉरर शैलीच्या चित्रपटासाठी स्वत:ला तयार केले. नाही तर कधीच मी असे चित्रपट केले नव्हते आणि त्यासाठी तयारही नव्हते. त्याची स्क्रिप्ट मला आवडली होती. त्यानंतर मी याच्यावर चित्रपट बनवणार असे ठरवले. हे काम खूपच आव्हानात्मक होते, मी कधी अशा गोष्टीचा सामना केला नव्हता. मी स्वत:ला अशा प्रकारचे पात्र साकारताना पाहू इच्छित हाेते. प्रेक्षकांनी अपेक्षा ही केली नसेल, अशी भूमिका मला करायची होती.
 

बातम्या आणखी आहेत...