आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anushka Sharma Finally Reacts To The BCCI Picture Controversy At The Sui Dhaaga Trailer Launch

BCCI च्या फोटोमध्ये ट्रोल झाल्यानंतर अनुष्का शर्माने सोडले मौन, दिले असे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अनुष्का शर्माचा 'सुई धागा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. यावेळी ती चांगल्या मूडमध्ये होती आणि पर्सनल प्रश्नांवर उत्तर देण्यासही तयार झाली. अनुष्का शर्माने गेल्यावर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न केले. नुकतीच ती विराटसोबत इग्लंड टूरवर गेली होती. येथे फक्त विराटच्या पत्नीलाच टूरवर येण्याची परवानगी देण्यात आली. टूर दरम्यान तिने इंडियन हाय कमीशनची भेट घेतली आणि तिने पहिल्या रांगेत विराट कोहलीच्या बाजूला उभे राहून फोटो क्लिक केला. तर टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत उभा होता. हा फोटो व्हायरल झाला आणि अनुष्काला यासाठी ट्रोल करण्यात आले. 

 

टीकेवर अनुष्काने दिले उत्तर 
- अनुष्काला या टीकेविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले की, "ज्यांना याविषयी उत्तर द्यायचे होते त्यांनी दिले आहे. मी ट्रोलिंगवर जास्त लक्ष देत नाही. मला वाटते की, या गोष्टीत काहीच तथ्य नव्हते. जे झाले ते गाइडलाइननुसार केले आणि पुढे जे होईल तेसुध्दा गाइडलाइननुसार होईल, मला याविषयी अजून काहीच बोलायचे नाही." 
- अनुष्का नुकतीच भारतात परतली आहे. कारण तिला सप्टेंबरमध्ये रिलीज होणा-या सुई धागा चित्रपटाचे प्रमोशन करायचे आहे. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...