आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC मध्ये 25 लाख जिंकणा-या महिलेचा संघर्ष ऐकून पाणावले अनुष्काचे डोळे, महिलाने सांगितले, नराधम बलात्कार करायचे आणि पोलिस बघ्याची भूमिका घ्यायचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'कौन बनेगा करोडपती'च्या यंदाच्या कर्मवीर एपिसोडमध्ये समाजसेविका सुधा वर्गीस सहभागी झाल्या होत्या. सुधा यांनी 13 प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन 25 लाखांची रक्कम जिंकली.  या शोमध्ये जेव्हा सुधा यांनी आपली आपबिती सांगितली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अनुष्का शर्माचे डोळे पाणावले, तर अमिताभ यांनी त्यांना सलमान केला. 


फक्त 2 लाइफलाइन वापरुन जिंकले 25 लाख रुपये
सुधा यांनी केवळ दोन लाइफलाइनचा वापर करुन 25 लाखांची रक्कम जिंकली. अमिताभ बच्चन म्हणाले, ''एकटी महिला, जिच्यात काही तरी करुन दाखवण्याची इच्छा आहे, हिंमत आहे, ती काहीही करु शकते. इच्छा तिथे मार्ग हे सुधा वर्गीज यांना बघून म्हणावेसे वाटते."

- सुधा यांना सायकल वाली दीदी म्हणून ओळखले जाते. अमिताभ यांनी त्यांना याचा अर्थ विचारला असता सुधा यांच्या चेह-यावर हास्य उमलले. त्यांनी सांगितले, गावांमध्ये अनेक मैल पायी प्रवास करावा लागत असे, त्यामुळे त्यांनी सायकलचा वापर सुरु केला. एका दिवसात  त्या 40-40 किलोमीटरचा प्रवास सायकलने करत होत्या. त्यामुळे त्यांचे नाव सायकल वाली दीदी असे पडले.
- सुधा वर्गीज म्हणाल्या, "KBC मधील माझा अनुभव खूप चांगला राहिला. हा शो आकर्षक आहे. अमिताभ यांच्यामुळे हा शो अधिक आकर्षक बनतो. येथे समाज आणि जगात घडणा-या घटना समोर येतात."

 

'प्रेरणा' आहे सुधा वर्गीस यांची कहाणी 

समाजसेविका सुधा या मुळच्या केरळच्या रहिवाशी आहेत. एका सधन कुटुंबात जन्मलेल्या सुधा यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब महिलांच्या भल्यासाठी खर्ची केले आहे. 5 सप्टेंबर 1944 रोजी केरळच्या कोट्टायममध्ये जन्मलेल्या सुधा 'नोत्रे दम अकादमी'मध्ये शिक्षिका म्हणून 1965 मध्ये बिहारमध्ये पोहोचल्या. जेव्हा त्या बिहारमध्ये गेल्या, तेव्हा तेथील परिस्थिती बघून कोलमडून गेल्या. तेथे खालच्या जातीतील विशेषतः मुसहर जातीतील महिलांवरील अत्याचार होत होता. सुधा यांनी सांगितले की, उच्च जातीतील लोक या महिलांवर बलात्कार करायचे आणि पोलिस तक्रारही नोंदवून घेत नसे. हे सर्व बघून सुधा यांनी 1986 मध्ये नोकरी सोडली आणि मुसहर जमातीच्या महिलांसोबत एका मातीच्या घरात राहू लागल्या. त्यांनी या महिलांना न्याय देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आणि अनेक आरोपींना तुरुंगात पाठवले. सुधा यांनी अनेक शाळा सुरु केल्या, गरजुंना घरं बनवून दिली. या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः वकिलीचे शिक्षण घेतले. सुधा यांनी मुसहर जातीच्या लोकांना शिक्षण आणि आत्मसन्मान मिळवून दिला. त्यामुळे ते अन्यायाविरोधात आवाज उठवू लागले. पण हे सगळं काम करताना सुधा यांना अनेक धमक्या देखील मिळाल्या. नाइलाजाने सुधा यांना मुसहरांची वस्ती सोडून काही दिवस दुस-या ठिकाणी राहायला जावे लागले होते. आता सुधा पटनानजीकच्या जमसौत नावाच्या गावात राहतात आणि 'प्रेरणा' नावाने गरीब मुलींसाठी फ्रीमध्ये शाळा चालवतात. प्रेरणाचे यश बघून बिहार सरकारने सुधा यांची मदत घेऊन 'प्रेरणा -2' नावाने आणखी एक शाळा सुरु केली.

 

जे अछुत होते त्यांनी जापानमध्ये जाऊन जिंकले मेडल...
सुधा यांनी मुलींना केवळ शिक्षणच दिले नाही तर आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी शाळेत एक कराटे टिचरही ठेवला. येथे प्रशिक्षित झालेल्या मुलींनी गुजरातमध्ये झालेल्या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धते 24 मेडल जिंकले. यापैकी 7 जणींनी 2011 मध्ये जापानमध्ये झालेल्या एशियन ज्युनिअर कराटे चॅम्पिअनशिपमध्ये 7 मेडल जिंकले आणि देशाचे नाव गौरवले. या सर्व मुली खालच्या जातीच्या आहेत. सुधा यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...