आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anushkas Presence In Indian High Commission With Indian Cricket Team, Anushka Sharma Got Trolled

टीम इंडियाच्या ऑफिशियल फोटोमध्ये ही काय करतेय? सोशल मीडियावर ट्रोल झाले अनुष्‍का आणि BCCI

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 9 तारखेपासून भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर या टेस्ट मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. यापूर्वी भारतीय टीमसाठी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयात भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर बीसीसीआयनं या कार्यक्रमाचा एक फोटो शेअर केला. या फोटोवरून आता बीसीसीआयवर सडकून टीका करण्यात येत आहे.

 

उपकर्णधारपेक्षा विराटची पत्नी महत्त्वाची का?
या फोटोमध्ये अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत दिसत आहे. तर संघातील इतर खेळाडूंच्या पत्नी यावेळी येथे उपस्थित नव्हत्या.  विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा पुढच्या रांगेमध्ये उभी आहे. तर भारतीय टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत उभा आहे.  नियमानुसार, तो विराट कोहलीच्या बाजूला उभा असायला हवा होता. त्यामुळे सोशल मीडियावरुन बीसीसीआयवर टीका होत आहे.

 

ट्रोलर्सने उपस्थित केले अनेक प्रश्न
अनुष्का शर्मा भारतीय टीमची सदस्य आहे का? दुसऱ्या क्रिकेटपटूच्या पत्नी या अधिकृत दौऱ्यावर नाहीत. इथे अनुष्का शर्मा का आहे? ती अगदी मध्यभागी आहे तर उपकर्णधार शेवटच्या रांगेत का? काही दिवसांपूर्वी हीच लोकं ऑनलाईन लेक्चर देत होती... उपकर्णधारापेक्षा अनुष्का जास्त महत्त्वाची,  हा फॅमीली फोटो नाही, टीम इंडियाचा फोटो आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...