मुंबई. सोशल मीडियावर अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटचे फोटोज व्हायरल होत आहे. हुबेहूब अनुष्का शर्मा सारखी दिसणारी ही मुलगी प्रसिध्द अमेरिकन सिंगर जूलिया माइकल आहे. जूलियाने स्वतः स्विकारले की, ती अनुष्का शर्मासारखी दिसते. ज्यूलिया माइकलने सोशल मीडियावर लिहिले की, "हाय अनुष्का शर्मा, खरंतर आपण जुळ्या आहोत." यावर अनुष्काने रिप्लाय केला होता की, "ओह माय गॉड, मी तुला आणि उरलेल्या 5 लोकांना शोधत होते." अनुष्काने रिप्लाय दिल्यानंतर जूलियाने रिप्लाय केला होता की, "हा हा हा... आपण एक दिवसासाठी एकमेकांची जागा घ्यायची का?" या ट्वीटवरुन जूलियाने जाहिर केले की, तिला एक दिवस तिचा पती विराट कोहलीची मिसेस बनायचे आहे. म्हणजे तिने डायरेक्ट अनुष्काला एक दिवस तिचा पती विराट मागितला. यूलियाच्या या ट्वीटवर अनुष्का-विराटने काहीच रिप्लाय दिलेला नाही. पण सोशल मीडियावर कपलचे चाहते तिला उत्तर देत हेत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, "डायरेक्ट म्हण ना की, तुला एक दिवसासाठी विराट कोहली हवा आहे...". दूस-या यूजरने लिहिले, "लोक मिसेस कोहली बनण्यासाठी इच्छुक असतात आणि हिला पाहा." एक यूजर म्हणाला, "तिचा पही कोहली आहे. हार्दिक पांड्या नाही." अजून एका यूजरने लिहिले की, "विराटला हे आवडणार नाही तो फक्त अनुष्कावर प्रेम करतो." पण विराट कोहलीला डायरेक्ट प्रपोज करण्याची ही पहिली वेळ नाही. 2014 मध्ये इंग्लंड क्रिकेट टीमच्या ऑनराउंडर डेनियल व्याटनेही विराटला सोशल मीडियावर प्रपोज केले आहे. डेनियलने ट्विटरवर लिहिले होते की, "कोहली मॅरी मी" या ट्वीटनंतर डेनियल खुप चर्चेत आली होती. तर जूलिया माइकल गाणेही लिहिलेते आणि तिला ग्रॅमी अवार्ड्सच्या दोन कॅटेगिरीमध्ये नॉमिनेटही करण्यात आलेले आहे.