आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेस कोहलीचा पफ स्लिव्स आउटफिटमधील हा स्टायलिश अंदाज बघून आलिया भट म्हणाली...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्नानंतर सध्या चित्रपटांमध्ये दिसत नाहीये. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अॅक्टिव आहे. पार्टी आणि अवॉर्ड शोमध्ये ती हजेरी लावताना दिसतेय. नुकतीच अनुष्का मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स शोमध्ये सहभागी झाली होती. मंगळवारी रात्री हा इव्हेंट पार पडला.

या अवॉर्ड शोमधील अनुष्काचा अंदाज लाजवाब होता. क्रिम कलरच्या पफ स्लिव्स आउटफिटमध्ये अनुष्का कमालीची सुंदर दिसली.

तिने या लूकमधील फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. अनुष्काच्या या फोटोवर फक्त चाहतेच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्रीही फिदा झालेल्या दिसत आहेत.

अभिनेत्री आलिया भटने  Most glamorous person ever अशी कमेंट अनुष्काच्या फोटोवर केली आहे. तर काजल अग्रवाल हिनेही अनुष्काच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केले आहे. 

अनुष्काच्या चित्रपटांविषयी सांगायचे म्हणजे ती शेवटची 'झिरो' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासह शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, पण अनुष्काच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

बातम्या आणखी आहेत...