Bollywood / स्विमसूटमध्ये अनुष्का शर्माने शेअर केला होता फोटो, आता सोशल मीडियावर उडवली जात आहे खिल्ली 

अनुष्काच्या फोटोवर बनले अनेक मीम्स

दिव्य मराठी

Aug 20,2019 01:09:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहलीसोबत वेस्ट इंडीजमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. अशातच तिने व्हाईट आणि ऑरेंज स्विमसूटमध्ये एक फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोला तिने कॅप्शन दिले, 'सन किस्ड अँड ब्लेस्ड' ज्यावर तिला 2 मिलियनपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. बीचवर घेतलेला या फोटोमुळे तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

अनुष्काच्या फोटोवर बनले अनेक मीम्स...
सोशल मीडिया यूजर्स अनुष्काच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवून शेअर करत आहेत. एका यूजरने 'सुई धागा' चित्रपटातील लुकसोबत तिचा लूक कम्पेअर करून लिहिले, 'पहिल्या फोटोमध्ये स्टार प्लसवरील सीरियलची अभिनेत्री, दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्रीचा रिअल लूक.' एका यूजरने तर तिचा लुक व्हीएलसी प्लेयरच्या अपडेटेड व्हर्जनसोबत कम्पेअर केले.

X