Home | Health And Lifestyle | Yoga Day | Anushka Sharma suffering from bulging disc problem

या आजाराचा सामना करतेय विराटची अनुष्का, डॉक्टरांनी पाहताच दिला बेड रेस्टचा सल्ला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 11:20 AM IST

स्लिप डिस्क म्हणजे नेमके काय असते आणि ती कशळामुळे होते, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच यावरील उपायही पाहणार आहोत.

 • Anushka Sharma suffering from bulging disc problem

  हेल्थ डेस्क - बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा विवध कारणांमुळे नेहमी चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आहे. सध्या ती स्लिप डिस्कच्या समस्येचा सामना करतेय. तिला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. पण स्लिप डिस्क म्हणजे नेमके काय असते आणि ती कशळामुळे होते, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच यावरील उपायही पाहणार आहोत.


  काय असते स्लिप डिस्क
  कमरेच्या खालच्या भागात आणि मणक्यातील हाडांच्या वेदनांना स्लिप डिस्क म्हणतात. जेव्हा स्पायनल कॉर्डमधून काही बाहेर येतात तेव्हा ही समस्या उद्भवते. डिस्कचा बाहेरचा भाग टणक असतो आणि त्याच्या आत लिक्विड भरलेले असते. डिस्कमधील जेलीसारखा भाग कनेक्टिव्ह टिश्यूजच्या सर्कलमधून बाहेर निघते आणि पुढे वाढलेला भाग स्पाइन कॉर्डवर दबाव निर्माण करतो. अनेकदा झटके किंवा दबावामुळे बाजूच्या टणक भागाला तडे जातात किंवा ते कमकुवत बनतात. तेव्हा जेलीसारखा द्रवपदार्थ निघतो आणि नसांवर दबाव येऊ लागतो. त्यामउले पायात वेदना किंवा सुन्न होणे असा त्रास होतो.


  या कारणांमुळे होते स्लिप डिस्क
  - अचानक खाली वाकणे
  - जास्त वजनाची वस्तू उचलणे
  - कमरेला झटका बसणे
  - स्नायूंमधील कमकुवतपणा
  - सारखे वाकून बसणे
  - शरिरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असणे
  - चुकीच्या पोझिशनमध्ये बसणे
  - खूप जास्त वेळे कॉम्प्युटरचा वापर करणे


  हे उपाय करा
  - स्लिप डिस्कच्या वेदना कमी करण्यासाठी रोज योगा आणि लहान व्यायाम करा.
  - खूप वेदना होत असतील तर एक्सपर्टच्या देखरेखित व्यायम करा.
  - आहारात फळे, हिरव्या भाज्या, गाजर, टोमॅटो, बीट यांचा समावेश ठेवा.
  - काही घरगुती उपायही करू शकता. जसे अद्रक पावडरमध्ये 5 लवंगा आणि काळे मीरे वाटून घ्या. त्याचा काढा दिवसातून 2 वेळा प्या.
  - शरिरात कॅल्शियमची कमतरचा असेल तेव्हाही असे होऊ शकते. त्यामुळे आहारात कॅल्शियमचा समावेश असलेल्या भरपूर वस्तुंचा समावेश करा.

Trending